spot_img
spot_img

शनिशिंगणापूर येथे केंद्रीय मंत्री शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):-केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या शनिशिंगणापूर येथील नियोजित दौऱ्याचा  पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी हेलीपॅडसह मंदीर परीसरातील नियोजनाची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला.

केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी भारतीय जनता पक्षाच्या शिर्डी येथील अधिवेशनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहाणार आहेत.यानिमिताने शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असून याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिल्ली येथील कालच्या भेटीत सुचित केले होते.

मंत्री विखे पाटील यांनी शनिशिंगणापूर येथे येवून मंदीर परीसराची पाहाणी केली.केंद्रीय मंत्री अमित शहा शनिदेवाला अभिषेक करणार आहेत.यासाठी सर्व सुविधांचा आढावा त्यांनी मंदीर प्रशासना कडून जाणून घेतला.आ.विठ्ठलराव लंघे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरीक्त पोलीस अधिकारी प्रशांत खैरे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था लक्षात घेवून याठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.जवळच्या अंतरावर करण्यात आलेल्या हेलिपॅडच्या जागेची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्यां समवेत केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!