लोणी प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे साईसतचरित व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी खुर्द येथे ग्रामदैवत श्री लोमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये साई निर्माण ग्रुप लोणी व लोणी खुर्द ग्रामस्थांच्या वतीने साई सच्चरित पारायण व श्रीमद् भागवत कथेचे नियोजन केले आहे.
लोणी येथे साई चरित्र व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
वृंदावन येथील भागवताचार्य श्री आनंद कृष्णाजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भव्य संगीतमय भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिल2023 या कालावधीमध्ये हा सोहळा सुरू होणार आहे. साई निर्माण ग्रुप व लोणी खुर्द ग्रामस्थ यांच्या विशेष पुढाकाराने 13 वर्षापासून साई सचरित पारायण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी श्रीमद् भागवत कथा सोहळा, व साई चरित्र पारायण आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 27 रोजी सुरू होणाऱ्या या सोहळ्याचे आयोजन असे आहे की, सकाळी 5:30 ते 8:30 या कालावधी दरम्यान साई सच्चरित पारायण वाचन होणार आहे. व सायंकाळी 6:30 ते 9:30 या कालावधीमध्ये श्रीमद् भागवत कथा निरूपण कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 27 रोजी भागवत महोत्सव( गोकर्ण कथा ), दिनांक 28 ला नारद चरित्र व श्री शुकदेव जन्म कथा, दिनांक 29 ला कपिल उपदेश व शिवपार्वती विवाह, दिनांक 30 ला ध्रुवचरित्र वामन चरित्र व रामकृष्ण जन्म, दिनांक 31 ला माखन चोरी लीला, गोवर्धन पूजा, दिनांक एक लामहाराज कथा स्वामिनी, कृष्ण विवाह, दिनांक 2 ला सुदाम चरित्र, शुकदेव विवाह कथा, दिनांक 3 ला होम हवन, अवतरणीका, व काल्याचे किर्तन व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. काल्याचे किर्तन हे ह भ प डॉक्टर जलाल महाराज सय्यद, ( करंजीकर ) यांचे होणार आहे. या कार्यक्रमांमध्ये पारायण करिता बसणाऱ्या लोकांकरिता उज्जैन, आग्रा, मथुरा, वृंदावन, वाघा बॉर्डर, अमृतसर, वैष्णोदेवी अशा धार्मिक स्थळांना अल्प दरात सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर लोणी खुर्द भजनी मंडळ, लोमेश्वर सेवा मंडळ, रणरागिनी महिला मंडळ,लोणी खुर्द येथील ग्रामस्थ, व्यावसायिक याचबरोबर अनेक धार्मिक संघटना यांचे विशेष पुढाकार असणार आहे अशी माहिती साई निर्माणचे श्री किरणराव आहेर यांनी दिली आहे.