कोल्हार (वार्ताहर) :- प्रतिवर्षीप्रमाणे गुडीपाडव्याचा मुहूर्त अर्थात हिंदू नववर्षानिमित्त कोल्हार भगवतीपूर गावातील सर्व मंदिरांवर जुने ध्वज बदलवून त्याजागी नवीन भगवे ध्वज उभारण्यात आले. हाती भगवे ध्वज घेत सनई चौघड्याच्या स्वरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषा परिधान करीत ग्रामस्थ यामध्ये सहभागी झाले. हिंदू नववर्ष उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले.
कोल्हार भगवतीपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीफळ वाढवून ध्वज बदलविण्यास प्रारंभ झाला. मिरवणुकीत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून पारंपारिक वेशभूषा केलेले ग्रामस्थ व तरुण हाती भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते.
येथील भगवतीदेवी कमान, भगवतीदेवी मंदीर, महालक्ष्मी मंदीर, श्रीराम मंदीर, गणपती मंदीर, गुरुदेव दत्त मंदीर, हनुमान मंदीर, खंडोबा मंदिर, मुनिसुव्रतस्वामी मंदिर, महादेव मंदीर, शनी मंदीर, सप्तशृंगी मंदीर, विठ्ठल-रुख्मिणी मंदीर, मुंजोबा मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदीर, विश्वकर्मा मंदीर, बिरोबा मंदीर, पाटीलबा मंदिर, कानिफनाथ मंदीर आदि मंदिरांवर नूतन भगवे ध्वज उभारण्यात आले.
मिरवणुकीची सांगता स्व. माधवराव खर्डे पा. चौकात झाली. यावेळी चौकात भगव्या ध्वजाची गुडी उभारण्यात आली. यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांना नववर्षाच्या शुभेच्छा देत यावर्षात सर्व क्षेत्रातील नागरिकांची भरभराट व्हावी याबद्दल प्रार्थना केली. तसेच गावातील रस्ता रुंदीकरणात दुकानदारांनी शांततापूर्ण सहकार्य केल्याबद्दल कौतुक केले. याशिवाय बाजारपेठ टिकण्यासाठी गावातील अतिक्रमणे स्वतःहून काढण्याचे आवाहन केले. अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी श्रीरामपूर दुध संघाचे संचालक अनिल खर्डे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. जयराम खंडेलवाल, स्व. शंकरनाना खर्डे पा. सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे, पंढरीनाथ खर्डे, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, डॉ. सुनील खर्डे, सुजित राऊत, बी.के. खर्डे, भगवतीपुरचे पोलीस पाटील सुखलाल खर्डे, जैन युवा मंच आनंद रांका, योगेश मुथ्था, निलेश शिंगवी, अतुल रांका, मयूर बंग, किरण तांबे ,विजय डेंगळे, अमोल खर्डे, अतुल राऊत, अभिजित तोरडमल, पांडुरंग देवकर, संदीप राऊत, रोहित खर्डे, गणेश गोसावी, अक्षय मोरे ,गणेश गागरे ,भैय्या गोसावी, बापू दळवी, आतिश मोरे, आदेश शिंदे ,अजय पटारे, महेश शेळके, गणेश मोरे, कृष्णा कुहिले ,संतोष जाधव,सोनू सिंग राजपूत आदि उपस्थित होते.