14.5 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

वीरबॅक ॲनिमल हेल्थ कंपनीकडून चिंचोलीच्या विद्यालयास १०० बेंच भेट

कोल्हार ( वार्ताहर ) :- वीरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई या कंपनीने सीएसआर फंडातून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील कै. जनार्दन काळे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास नवीन १०० बेंचेस उपलब्ध करून दिल्या. तसेच त्या स्वतःच्या साधनाने विद्यलयात पोहोचदेखील करून दिल्या.
 चिंचोली ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. सदर बेंचेस मिळविण्यासाठी चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे तसेच बाबासाहेब वर्पे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या मदतीने विद्यालयाला चांगल्या प्रतीच्या १०० बेंचस (अंदाजे रक्कम – ४२५००० रुपये ) प्राप्त करून दिले. 
सदर बेंच वितरणप्रसंगी स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव लाटे, उपाध्यक्ष सर्जेराव सोनवणे, उपसरपंच विलास लाटे,  गीताराम पठारे, संभाजी अरगडे, दिलीप दाढकर, अकिल शेख, विजय सिनारे, मुन्ना हारदे तसेच प्राचार्य सुधाकर गोरे आणि श्री. गिरी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!