spot_img
spot_img

सिद्धटेक मंदिरा समोरील अनधिकृत प्रार्थनास्थळा विरोधात आ. संग्राम जगताप हातात दंडुका घेत आक्रमक सकल हिंदूंचे अनधिकृत प्रार्थनास्थळ पडण्याचे आंदोलनआ. संग्राम जगताप व हिंदू धर्मरक्षक सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरा समोरील अनाधिकृत अतिक्रमणावर हातोडा

नगर ( जनता आवाज वृत्तसेवा):लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपती पैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरा जवळ काहींनी अनधिकृतपणे थडगे उभारून हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा संबधितांनी केला होता. याबाबत आ.संग्राम जगताप यांनी प्राशासनास लक्ष घालून सादर अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होते. मात्र प्रशासनाने याची दखल न घेल्याने आ.जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत गुरवारी निवडक कार्यकर्त्यांसह थेट सिद्धटेक गाठले. आ. संग्राम जगताप व हिंदू धर्म रक्षक सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरा समोरील अनाधिकृत अतिक्रमणावर हातोडा मारला. यावेळी आ.जगताप यांनी स्वतः हातात दंडुका घेत ते थडगे पाडले. यावेळी जय श्रीराम… जय बजरंगबली…, जिथे येईल अली, तिथे येईल बजरंगबली… अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक मंदिराजवळ काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. या अनधिकृत बांधकामानंतर येथील प्रार्थनास्थळी एका समाजाकडून पूजाही सुरु झाल्याचे लक्षात येताच येथील ग्रामस्थांनी ही बाब हिंदुत्ववादी संघटना तसेच आमदार संग्राम जगताप यांना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना व संग्राम जगताप यांच्याकडून संबंधित अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाला कळवले होते. परंतु त्यानंतर देखील या अतिक्रमना विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूनिका घेत समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह गुरवारी सिद्धटेक गणपती मंदिरा समोरील त्या अनधिकृत थडग्यावर स्वतः हातोडा चालवत संबंधित अतिक्रमण जमीनदोस्त केले.

यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी असे अनधिकृत थडगे किंवा बांधकामे असतील ते प्रशासनाने कारवाई करून काढावे अन्यथा आम्ही ते स्वतः काढू. जिल्ह्यात काही गटांकडून हिंदुंच्या धार्मिक स्थळांजवळ अशा प्रकारचे अनधिकृत कृत्य करण्याचे प्रकार वाढत आहेत. ते हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारे आहेत. आता आम्ही सहन करणार नाही त्यांना जाशास तसे उत्तर देऊ.

घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त

सिद्धटेक येथे गणपती मंदिराबाहेर असलेल्या त्या विवादित जागेवरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील कोणताही त्रास होऊ नये याची देखील यावेळी दक्षता घेण्यात आली. मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

प्रशासनाला आली ऐनवेळी जाग!

दरम्यान आ. जगताप व हिंदुत्ववादी संघटना कडून या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्या संदर्भात कळविले होते तरी कुठलीही कारवाई न करणाऱ्या स्थानिक प्रशासनाला ऐनवेळी जाग येत दोन दिवसांपूर्वी संघटना आक्रमक झाल्याचे समजताच संबंधित अतिक्रमणातील थडग्याला शेंदूर लावत तिथे नवनाथांची प्रतिमा ठेवली. परंतु आज आलेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित अतिक्रमण जमीनदोस्त केले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!