नेवासा फाटा:-नेवासा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करतानाच तालुक्यातील दळणवळणासाठी महत्त्वाचे असलेले रस्ते विकासासाठी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .असे प्रतिपादन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुनीताताई गडाख यांनी केले.
देडगाव ता नेवासा येथे रस्ता कामाचे लोकार्पण करतांना मा सभापती सौ सुनीताताई गडाख (छाया:श्रीनिवास रक्ताटे)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून पुर्ण झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सौ .गडाख बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे होते . देडगाव ते शहापूर या 25 लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याचे खडीकरण करणे, मारुती मंदिरासमोर 6 लक्ष रुपये खर्चाच्या पेव्हिंग ब्लॉक बसविणे ,10 लक्ष रुपये खर्चाच्या गावातील देवी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे, 30 लक्ष रुपये खर्चाच्या देडगाव ते तांबे वस्ती, औटी वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामांचे लोकार्पण मारुती मंदिर देडगाव येथे संपन्न झाले.
यावेळी बोलताना सौ . गडाख म्हणाल्या की आपल्या परिसरातील विविध कामे कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू . कोरोना काळात अनेक अडचणी असतांना देखील आ गडाख यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून अनेक कामे पूर्णत्वास आणली पुढील काळातही कितीही अडचणी आल्या तरी आ गडाख हे विकासकामे मार्गी लावून शेतकरी, कष्टकरी व तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.पोटखराबा तसेच वर्ग दोन मधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी दुरुस्ती राहिली असेल त्यांची ही दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असेही त्यांनी यावेळी सांगितले .यावेळी मा प स सदस्य बाळासाहेब सोनवणे , मा प स सदस्य अजित मुरकुटे , मा सरपंच योगेश होंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मा जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे मा . प.स. सदस्य अजित मुरकुटे , मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे , मुळा बॅकेचे चेअरमन माणिकराव होंडे , महेश निकम , कारभारी चेडे,कडूभाऊ तांबे , चंद्रभान कदम , लक्ष्मण बनसोडे , संतोष तांबे , महादेव मुंगसे , बाबासाहेब मुंगसे,निवृत्ती मुंगसे,हरिभाऊ कोकरे
अँड गोकुळ भताने , शिवाजी काजळे ,अरुण बनसोडे , सागर मुंगसे , योसेफ हिवाळे, जालिंदर चांदघोडे , नवनाथ मुंगसे , गणेश औटी आदिसह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी तर सुत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी व आभार अशोक मुंगसे यांनी मानले .
..
देडगाव ता नेवासा परिसरात आ शंकरराव गडाखांच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे मार्गी लागत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.