संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर तालुक्यामध्य मोठ्या प्रमाणावर वनविभागाचे क्षेत्र आहे .कार्यक्षमतेने वन विभागाचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील वन क्षेत्रास स्वतंत्र वन विभागाचा दर्जादेण्यात यावा अशी मागणी आ अमोल खताळ यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांची संगमनेरचे आ अमोल खताळ यांनी भेट घेत वनविभागा तील स्वतंत्र उपवन विभागलगत असणा ऱ्या वन विभागांमध्ये समायोजन करण्या बाबतचा शासन निर्णय रद्द करण्यातयावा व या उपविभागांना स्वतंत्र वनविभागाचा दर्जा देऊन त्यावर विभागीय वनाधिकारी दर्जा च्या अधिकाऱ्याची पदस्थापना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे वनमंत्रीगणेश नाईक यांना केली आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन वनमंत्री नाईक यांनी दिली आहे.