15.6 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

नारायणगाव जवळ भीषण अपघात ९ ठार , ७ गंभीर जखमी . ५ लाखांची मदत जाहीर .

पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पुणे जिल्हयातील नारायणगाव जवळील पुणे नाशिक हायवेवर खाजगी प्रवासी वाहनाने बंद पडलेल्या महाबळेश्वर डेपोच्या एसटीला जोराचे धडक दिल्याने झालेल्या अपघातात ९ प्रवास दगावले , तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत .

हा नवीन वर्षातील सर्वांत भीषण अपघात झाला आहे . नारायणगाव जवळील पुणे – नाशिक बायपासला पुण्याच्या दिशेने जाताना खाजगी गाडीने रस्त्यामध्ये बंद पडलेल्या महाबळेश्वर एस टी डेपो च्या एसटी बसला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत . मृतांची ओळख पटली असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये देबूबाई दामू टाकळकर , वय ६५ वर्षे , राहणार – वैशखखेडे ता . जुन्नर, जि . पुणे , विनोद केरू भाऊ रोकडे , वय ५० वर्षे , राहणार – कांदळी , ता . जुन्नर , जि .पुणे , युवराज महादेव वाव्हळ , वय २३ वर्षे , राहणार – कांदळी , ता . – जुन्नर , जि . पुणे , चंद्रकांत कारभारी गुंजाळ , वय ५७ वर्षे , राहणार – कांदळी , ता . जुन्नर , जि . पुणे , गीता बाबुराव गवारे , वय ४५ वर्षे , राहणार – कांदळी , ता . जुन्नर , जि . पुणे , भाऊ रभाजी बडे , वय ६५ वर्षे , राहणार – नगदवाडी , ता . जुन्नर , जि . पुणे , नजमा अहमद हनीफ शेख वय ३५ वर्षे , राहणार – राजगुरुनगर व वशिफा वशिम इनामदार , वय ५ वर्षे , पत्ता माहित नाही , मनीषा नानासाहेब पाचरणे वय ५६ वर्षे , राहणार – कांदळी , ता . जुन्नर , जि . पुणे . तर गंभीर जखमी झालेल्यांना खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .

सदर अपघात स्थळी जुन्नरचे आ . शरद सोनवणे यांनी भेट देऊन या घटनेची राज्याचे परिवहन मंत्र्यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून माहिती दिली असता त्यांनी अपघातात मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या सर्व अपघात ग्रस्तां मधील जखमींवर तातडीने वैद्यकिय उपचार करण्याचे आदेश दिले आहे . परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने मृत झालेल्या व्यक्तींना तातडीचे पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे . सदरच्या अपघातग्रस्त खाजगी गाडीची अवस्था पाहता अतिशय भयानक झाली आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!