6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस प्रशिक्षणांतून बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राने घडविले ५६० उद्योजक कृषि उद्योगांसह,शेती प्रक्रिया,मार्केटींग आणि शेतीपुरक व्यवसायाला मिळतेय चालना

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-शेती क्षेत्राला उद्योगाची गरज देणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेती क्षेत्रातील पदवीधरांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले तर त्याच्या ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रमाणात रोजगार आणि शेती क्षेत्रामध्ये चांगले सल्लागार येऊन शेती क्षेत्राला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रात अंतर्गत कृषी मंत्रालय भारत सरकार, मॅनेज हैदराबाद आणि नाबार्ड पुणे यांच्या माध्यमातून ॲग्री क्लिनिक्स आणि ॲग्री बिझनेस या कोर्सच्या माध्यमातून ३३ बॅच मधून एकूण ९२४ कृषि पदविधराना प्रशिक्षण देऊन याव्दारे ५६० प्रशिक्षणांर्थीनी कृषी उद्योजक आणि पूरक व्यवसाय सुरू केले आहेत.   

कृषि शिक्षणातील बी.एस्सी (कृषि), हॉटीकल्चर, कृषि अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, मत्स्यव्यवसाय किंवा फॉरेस्ट्री या क्षेत्रातील पदवी किंवा पदवीकाधारक असणा-या  मॅनेज हैदराबाद,नाबार्ड, पुणे आणि केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय पुरस्कृत ॲग्री क्लिनिक्स ॲग्री बिझनेस या कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची राहणे, जेवण व्यवस्था मोफत आहे. कोर्स विनामुल्य आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुकांचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कमीतकमी एक वर्ष झालेले असले पाहिजे. प्रशिक्षणार्थी व्यवसाय करण्यास इच्छूक असला पाहिजे. या अटीवर प्रवेश दिला जातो.

कोर्स पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना राष्ट्रीयकृत बॅन्कांकडून २० लाख रुपयेपर्यंत व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले जाते. तसेच व्यवसायासाठी खुल्या वर्गातील उमेदवारासाठी ३६ टक्के तर महिला आणि अनूसूचित जाती जमातीतील उमेदवारांसाठी ४४ टक्के अनुदान उपलब्ध आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात व्यवसाय निवड, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, मार्केटींग, प्रकल्प आराखडा तयार करणे, अभ्यासदौरा यासारख्या व्यवस्थापकीय आणि तांत्रिक विषयांचा समावेश आहे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम उद्योजक उभा करतांनाच प्रशिक्षणांतून नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे संचालक डाॅ. उत्तमराव कदम, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे,शांताराम सोनवणे, भरत दवंगे डाॅ. विलास घुले, प्रियंका खर्डे, सज्जला लांडगे,डाॅ विठ्ठल विखे ,कैलास लोंढे यांच्या प्रयत्नातून हे प्रशिक्षण केंद्र राज्यात प्रगती पथावर आहे. मंत्री विखे पाटील यांनी केंद्रांमध्ये प्रशिक्षणाच्या दृष्टीने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याने ॲग्री क्लिनिक्स ॲग्री बिझनेस प्रवेशासाठी या केंद्रास मोठी पसंती कृषी पदवीधरांची राहिली आहे. या माध्यमातून अनेक व्यवसाय उभे राहिले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतानाच कृषी उद्योजकाच्या माध्यमातून शेती क्षेत्राला नवी चालना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राने दिली आहे. युवकांबरोबरच या प्रशिक्षणामध्ये युवतींचा वाटा देखील मोठा राहिला आहे. आज अनेक युवतींनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय, अनेक कृषी पदवीधरकांनी नामवंत कंपन्या, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती त्याचबरोबर विविध पिकाचे सल्लागार म्हणून शेती क्षेत्राला चालना देण्याचे काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून झाले आहे.

बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये विविध सेवा सुविधा आहेत राहण्याची उत्तम सोय त्याचबरोबर या ठिकाणी जैविक खते जैविक औषधे निर्मीती प्रयोगशाळा, माती, पाणी देठ आणि खत परिक्षण प्रयोग शाळा, पीक पूर्व अनुमान केंद्र,रोपवाटीका त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रक्षेत्रावरती प्रशिक्षण या माध्यमातून आम्हाला मोठी चालना मिळाली याच माध्यमातून मी केलवड गावामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायाला मी जनसेवा फाउंडेशन अंतर्गत बचत गटाची जोड देऊन अनेक महिलांना रोजगारही दिला आहे. यातून डाळ मिल, पशुखाद्य निर्मिती आणि भाजीपाला प्रक्रिया यावरती काम करत असून या माध्यमातून मी स्वयंपूर्ण झाले आहे आणि मला वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचं मोठं मार्गदर्शन मिळत असल्याची प्रतिक्रिया केलवड येथील सौ मनीषा गमे यांनी दिली.तर नोकरी सोडून प्रशांत पुलाटे आणि संजय राऊत यांनी गांडूळ खत प्रकल्पातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!