अहमदनगर (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्ह्यातील देहरे, नांदगाव, शिंगवे,इस्लामपूर यासह परिसरात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून हे दूर्दैवी आहे, मात्र सरकार हे आपल्या पाठीशी आहे त्यामुळे काळजी करू नका असा दिलासा खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी गारपीट व अवकाळीग्रस्त भागाची पाहाणी करताना शेतकऱ्यांना दिला.
त्यांनी देहरे,नांदगाव,शिंगवे इस्लामपूर या परिसरातील गारपीट व अवकाळी पडलेल्या भागाची पाहणी केली. यावेळी बाजीराव दामोदरराव काळे, लक्ष्मण किसन काळे ,विजय भानुदास काळे, सुरेश चिमाजी काळे, सुनंदा अजित काळे , सुभाष मारुती काळे ,संभाजी काळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले की जिल्हाधिकारी यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या असून कर्मचारयांचा संप जरी सुरू असला तरी पंचनामे थांबवु नका , त्यामुळे शेतकर्यांनी काळजी करू नये शासन आपल्या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई करेल असे याप्रसंगी आश्वासन दिले.
या गारपीटीत कांदा, गव्हू,मका डाळिंब,संत्रे यासह जनावरांच्या चार्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून याबाबत आपण राज्याचे उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी संपूर्ण माहिती देणार असल्याचे खा.विखे यांनी यावेळी सांगितले. जनावरांच्या चार्याच्या बाबतीत तात्काळ काय उपाय योजना करता येतील त्या करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगून शेतकऱ्यांस एक महिन्यात मदत मिळेल असे आश्वासन यावेळी दिले.
या दौऱ्यात उपविभागीय आधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार उभेश पाटील यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, मंडळ आधिकारी यांची उपस्थिती होती.