22.7 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

शनी देवस्थान वाहनतळ प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वाकडे भक्तांसाठी स्वयंचलित बॅरियर , फास्टेग अन् थेट मुख्य दर्शनरांगेत मिळेल प्रवेश

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा ):-शनि शिंगणापूरातील वाहनतळ प्रवेशद्वार कमानीचे काम पूर्णत्वाकडे गेल्याने शनिभक्तांची वाहने शिंगणापूरात आल्यानंतर आता या कमानीतून देवस्थानच्या वाहन तळावर तर भाविकही थेट मुख्य दर्शन रांगेत जावू शकणार आहेत. 24लाख रू खर्चाचे हे प्रवेशद्वार असून ते भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान कडून बांधण्यात आले आहे.

येत्या आठवड्यात हे काम पूर्ण होणार आहे. शनिशिंगणापूरला देशभरातून सतत भाविकांचा ओढा असतो. परंतु भाविकांना वाहने कुठे पार्क करावीत, मुख्य दर्शन रांगेत कुठून जावे याचा अनेकदा संभ्रम पडत असतो मात्र आता भाविकांना देवस्थानचे वाहनतळ ठळकपणे तर दृष्टीस पडणारच आहे शिवाय भाविकांना, शनिभक्तांना आता वाहनतळातून थेट मुख्य दर्शन भुयारी रांगेत सहजपणे जाता येणार आहे.

त्यासाठी देवस्थान कडून वाहनतळ प्रवेशद्वार बांधण्यात आले असून ते आठवडा भरात पूर्ण होणार आहे. हे वाहनतळ प्रवेशद्वार दहा नग आर सी सी कॉलमचे असून प्रवेशद्वारातून वाहने ये -जा करण्यासाठी दोन स्वतंत्र गेट असणार आहेत तर मध्यभागी सुरक्षा व्यवस्था केबीन असणार आहे. प्रवेशद्वारावर दगडाच्या घडीव कॉलम प्रमाणे नक्षीदार अशी डिझाईन, स्लबवर नक्षीदार छज्जा, रेलिंग डिझाईन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या प्रवेशद्वारात स्वयंचलीत ब्यारियर व फासट्याग सुविधाही असणार आहे. या प्रवेशद्वाराचे लाईट फिटिंग व कलरिंग काम या आठवड्यात पूर्ण होणार आहे.शिंगणापूरात भाविकांचे वाहन आले की लगेचच हे भव्य प्रवेशद्वार भाविकांच्या दृष्टीस पडणार आहे. दूर वरून आलेल्या भाविकांसाठी हे प्रवेशद्वार मार्गदर्शक ठरणार आहे. येथून दर्शन रांग, प्रसादालय, मुख्य रस्ता, प्रशस्त अल्पदरात भाविकांना पार्किंग व्यवस्था मिळणार आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेत ये -जा करण्यासाठी दोन भुयारी दर्शन मार्ग तर आहेतच शिवाय पानसतीर्थ सुशोभीकरण प्रकल्पही प्रथम दृष्टीस पडणार आहे असे देवस्थानचे सहायक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सांगितले.

हे प्रवेशद्वार बांधकाम व त्यावरील डिझाईन साठी राज्याबाहेरील कला कुसर कारागीर बोलावण्यात आलेले होते. प्रवेशद्वारावरील कोरीव कला कुसरही बघण्यासारखी आहे. देवस्थानचे वाहनतळ वमंदिर मुख्य दर्शन मार्ग भाविकांना या प्रवेशद्वारामुळे सहज दिसेल असे शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!