संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यामध्ये विकासाचे राज कारण करत असताना आपल्या वारकरी संप्रदायाला आणि हिंदू धर्माला ज्या अडी अडचणी येत आहे. त्या सोडवण्यासाठी २४ तास तुमच्याबरोबर राहील असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला
वैकुंठवासी भिमाजी महाराज नवले यांच्या नावाने निघणाऱ्या श्रीक्षेत्र बाळेश्वर ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे स्वागत गुंजाळ वाडी शिवारातील भूमी गोल्ड ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी येथे आ अमोल खताळ यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी तेबोलत होते यावेळी श्री धोंडीबा खताळ सौमंगल खताळ आ अमोल खताळ सौ नीलिमा खताळ श्री राहुल खताळ व सौ शितल खताळ यांच्या हस्ते महाआरती करून पूजन करण्यात आले .यावेळी या दिंडीचे प्रमुख विश्वनाथ महाराज नवले यांच्या हस्ते आ अमोल खताळ यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला.
आ खताळ म्हणाले की धांदरफळ गावा तून दिंडी निघत असते. परंतु माझी आई अनेक वर्षापासून भिमाजी महाराज नवले यांच्या दिंडीमध्येच पाईवारी करीत आहे. तुमच्या सर्वांच्या पुण्याईने मला संगमनेर विधानसभेची उमेदवारी मिळाली. तुम्ही सर्वांनी आपल्या घरात उमेदवारी भेटली आहे. असे मानून तुम्ही सर्वांनी तन-मन-धनाने माझ्यासाठी मतदानरुपी दान मागि तले. पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर या पायी दिंडीला जाणाऱ्या भाविकांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. तुमच्या सर्वांमुळेच मला संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम तुमच्याबरोबर राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी भूमी ऍग्रोचे प्रमुख धोंडीबाखताळ संचालक राहुल खताळ प्रगतशील शेतकरी बाळासाहेब गुंजाळ रोहिदास गुंजाळ सोमनाथ जगताप पंढरीनाथ जगताप सुयोग गुंजाळ अजून गोपी गुंजाळ सुधीर शिंदे सुधीर शिंदे यांच्यासह गुंजाळवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
तुमच्या आशीर्वादाने देशात सन्मान-आ खताळ
संगमनेरचे नव्याने निवडून आलेले अमोल खताळ नेमके कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना विचारले होते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे तुमच्या या मुलाचासन्मान राज्यात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये झाला आहे. या सन्मानात खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा व वारकरी संप्रदायाचा फार मोठा वाटा आहे हे मला विसरून चालणार नसल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
हा सुवर्णयोग येण्यासाठी खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाचा फार मोठा त्याग आहे .माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये मला माझे आई-वडील मोठा भाऊ संदीप असो अगर राहुल असो यांनी कोणी ही कधीही अडकाठी आणली नाही मात्र आज हा सोन्याचा दिवस पाहण्यासाठी माझा मोठा भाऊ संदीप नाही याची मला उणीव कायमच भासत राहणार आहे मोठ्या भावाची आठवण आल्यानंतर आ अमोल खताळ हे थोड्यावेळ भावुक झाले.