पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील क्रांती शुगर कारखान्याने ऊसाला इतर साखर कारखान्यांना प्रमाणेच २८०० रुपये प्रति मॅटेक्ट्रीक टन भाव दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे , अशी माहिती कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश नवले यांनी दिली आहे .
क्रांती शुगर कारखान्या ने या वर्षी नगर जिल्ह्यात सर्वांत जास्त ऊसाला शेकडा १० . ९१ टक्के उच्चांकी रिकव्हरी दिली आहे . कार्यक्षेत्र व बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रीक्ट टन २८०० रुपये भाव देण्याचे जाहीर केले असून पंधरवाडा दि . १५ नोव्हेंबर ते दि . ३० नोव्हेंबर २०२४ मध्ये कारखान्याला आलेल्या ऊसाचे पैसे २, ७०० मॅट्रीक टना प्रमाणे पैसे अदा केलेले असून उर्वरित १०० रुपये मेट्रीक टना प्रमाणे राहिलेला फरक अदा करण्यात येणार आहे , तसेच त्या पुढील पंधरवाडात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला आहे , त्यांच्या ऊसाचे बिल २८oo रुपये प्रति मेट्रीक टन दराप्रमाणे लवकरच अदा करण्यात येईल .
क्रांती शुगर कारखान्याने आज अखेर १ लाख ७२ हजार ३५१ . ४९६ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून १ लाख ८६ हजार ११० पोती साखर उत्पादन झाले आहे . कारखान्या कडे पारनेर , श्रीगोंदा , नगर , श्रीरामपूर , पाथर्डी , शिरूर , जुन्नर तालुक्यातून बैलगाडी , ट्रॅक्टर , ट्रॅक द्वारे मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा होत असल्याने कारखाना पुर्ण क्षमतेने चालविला जात असून कारखान्याची प्रति दिन ३ , ५०० मॅट्रीक टन ऊस गाळपाची क्षमता असल्याची माहिती ही कारखान्याचे चेअरमन नवले यांनी दिली आहे .