13.8 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

संभाजीराजे सरकारवर संतापले

मुंबई – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने हवालदिल झालेला शेतकरी आता पुन्हा राज्य सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.
राज्य सरकारनेही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. पण अद्याप कुठलीही मदत शेतकऱ्यांच्या हाती आलेली. यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यकर्त्यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.
अवकाळी पावसाच्या फटक्यात शेतकरी भरडून निघाला आहे. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाहीये. यावर संताप व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्विट केलं आहे.
‘अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल’ असं ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!