-0.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

विरोधकांनी सुडाचे राजकारण करू नये- खा.डाॅ.सुजय विखे पाटील संस्थेच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारयांना 10% वेतनवाढ जाहिर

राहुरी (प्रतिनिधी) :-साखर कारखान्याची वाट लावून शिक्षण संस्थेचे वाटोळे करणारे विरोधक आम्ही चोरी केली असा आरोप करताना संस्थेचा चढता आलेख आणि कारखाण्याचे सर्वोत्तम गाळप हे विसरून गेल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून सात वर्षात परिवर्तन मंडळाने मोठे परिवर्तन केले असल्याचे सांगितले. 
  राहुरी येथे विवेकानंद नर्सिंग होमचे विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग महाविद्यालय व शिवाजी प्रसारक मंडळाच्या महिला वस्तीगृहाच्या इमायतीच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. 
   या समारंभाच्या अध्यक्षस्थानी तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे हे होते. 
  यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की सात वर्षापूर्वी परिवर्तन मंडळ पॅनल कडे हा कारखाना आणि शिक्षण संस्था आल्या तेव्हा कारखान्यावर बाराकोटी चे तर शिक्षण संस्थेचे अठरा महिन्याचे कर्मचारयांचे  वेतन थकित होते, शिवाय बँक कर्ज देखील होते. आमच्या संचालक मंडळाने अत्यंत सचोटीने,काटकसरीने वेळ प्रसंगी पदरमोड करून आम्ही कारभार केला आणि विरोधक आम्ही चोरी केली असे आरोप करत आहेत, जनतेला विखे पाटील घराणे हे माहित असून पन्नास वर्षापासुन गोरगरीबासाठी सत्तेचा वापर आम्ही केला असे खा.विखे यांनी सांगतानाच राहुरीचे पाणी हे जरा वेगळे आहे अशी कोटी केली. राहुरीचे भविष्य हे या शिक्षकांच्या हाती असून आमच्या राजकारणात विद्यार्थांच्या भविष्याशी आपण खेळू नका अस आवाहन याप्रसंगी त्यांनी केले. 
   आमच्या कार्यकाळात मानधन वाढवले,भत्ते वाढवले आणि आज दहा टक्के वेतनवाढ जाहिर करत असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगून भविष्यात आपल्या उज्वल भविष्यासाठी आपण आम्हाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
 या उद्धाटन समारंभास डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे , उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस,  संचालक मंडळ, महाविद्यालयाचे कर्मचारी,शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी नागरिकांची उपस्थिती होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!