-0.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड ; विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधीत प्रवरा अव्वल

लोणी दि.१७ प्रतिनिधी :-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनीरिंग विभागाच्या १४ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय नामांकित सीई-एन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई (जर्मनी आधारित कंपनी) कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

      शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात प्लेसमेंट विभाग संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. शिक्षणासोबत नोकरी मिळून देण्यात मोठी आघाडी या महाविद्यालयाने घेतली आहे. सिव्हील इंजिनीरिंग विभागाचे आदित्य शिर्के, प्रतीक्षा सोनार, सुषमा डोंगरे, संस्कृती सामल, महेक शेख, प्राची देशमुख, परशुराम वाल्हेकर, वैभव निर्मळ, किरण माळी, विराज काकडे, शर्वरी काळे, पुनम लावरे, राधिका पानसरे, हर्षवर्धन मिरपगार विद्यार्थ्यांना सीई-एन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई (जर्मनी आधारित कंपनी) कंपनी तर्फे आलेल्या मान्यवरांनी मुलाखती मुलाखती घेणाऱ्या टीमने विद्यार्थांना महाविद्यालयात मिळत असलेल्या प्रक्टिकल नॉलेज बद्दल समाधान व्यक्त केले.
सदर प्लेसमेंट आयोजित करण्यासाठी सिव्हील इंजिनीरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद कोळसे , प्रा. प्रशांत चव्हाण, सिव्हील इंजिनीरिंग विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी, प्रा. लक्ष्मण लहामगे यांनी प्रयत्न केले आहेत.
 या यशाबद्दल महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, विभाग प्रमुख डॉ. प्रमोद कोळसे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
…..
  प्रवरेत शिक्षणांसोबतचं वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचे करीअर घडविले जाते. शिक्षणसह नोकरी ही हे तत्व असल्याने विविध कंपन्यासह माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून बद्दलते तंञज्ञानाची माहीती दिली जात असल्याने नोकरीची मोठी संधी विद्यार्थ्याना मिळते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!