लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-अध्यात्मिक साहीत्य आणि अभंगातून संतांच्या विचारांची जोपासना करण्याचे काम वारकऱ्यांकडून होत आहे. गावातील मंदिरातून टाळ मृदूंगाच्या गजरात गायल्या जाणार्या भजनातूनच अध्यात्मिक संसकृतीचा पाया भक्कम झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले
जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि माजी खा डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी मतदारसंघातील शिर्डी , राहाता ,साकुरी कनकुरी, निमगांव,नांदुर्खी बु ।। नांदूर बुद्रुक गांवाना भजन साहित्याचे वितरण जनसेवा फौडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,साकुरीच्या सरपंच सौ.मेघना दंडवते, बाबासाहेब डांगे, दशरथ तुपे ,मंगेश कातोरे, संदीप दंडवते, कैलास कातोरे, सचिन कोळगे, प्रकाश मते, बाबासाहेब मते आदींसह वारकरी उपस्थित होते. अधीन सर या गावातील भजनी मंडळ भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र ही भूमी संताच्या विचारांने समृद्ध आहे. या संतांचा वारसा जतन व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून नेहमीच वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या भजनी मंडळातून अध्यात्मिक भजनी मंडळाकडून संतांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना भजन साहित्य त्याचबरोबर इतर साहित्याचे वितरण हे शिर्डी मतदार संघामध्ये होत आहे. या माध्यमातून तरुण पिढीला अध्यात्मामध्ये आवड निर्माण करण्याचं काम या आध्यात्मिक वाटचालीतून व्हावे हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विविध धार्मिक स्थळांना देखील मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी दिला जात असतो. या माध्यमातून आपली शक्तीपीठे ही अधिक लोकाभिमुख करण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितले. मिळालेल्या साहित्याच्या वापरातून अध्यात्मिक वाटचाल यशस्वी करावी आणि या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं जतन आपण सर्वांनी करावे असेही सौ. विखे पाटील यांनी सांगितले.



