8.2 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

झालेला सन्मान राज्यातील शेतक-यांना समर्पित – जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देवून झालेला सन्मान खूप मोठा असून, झालेला सन्मान राज्यातील शेतक-यांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या २६ व्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देवून राज्यपाल डॉ.सी.पी.राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कृषी मंत्री आणि प्रकुलपती माणिकराव कोकाटे, मंत्री मेघना बोर्डीकर, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ.व्ही.के.तिवारी, कुलगुरू डॉ.इंद्रमणी, केद्रीय मूल्य आयोगाचे पाशा पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाने केलेल्या सन्मानाबद्दल बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्यामुळे राज्याला कृषी विद्यापीठाची देण मिळाली. त्यांच्या नावाने विकसित झालेल्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने केलेला सन्मान हा माझ्यासाठी खूप मोठा असून, राज्यातील शेतक-यांना हा सन्मान आपण समर्पित करीत असल्याचे त्‍यांनी सांगितले.

मराठवाडा कृषि विद्यापीठाने विविध क्षेत्रात केलेले संशोधन महत्वपूर्ण आहेच, पण भविष्याची गरज लक्षात घेवून आपल्या संशोधनाची दिशा आता बदलावी लागणार आहे. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी विद्यापीठांना काम करावे लागणार असल्याचे सांगून विषमुक्त शेती निर्माण करण्याचे आव्हान आपल्या सर्वांना स्विकारावे लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

बांबू शेतीच्या संदर्भात पाशा पटेल यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख करून ना.विखे पाटील म्हणाले की, येणा-या काळात महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्याचे धोरण राज्य सरकराचे आहे. यासाठी कराव्या लागणा-या कामा करीता आजचा सन्मान पाठबळ देणारा ठरेल आशी भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

परभणी येथील कृषि विद्यापीठाच्‍या झालेल्‍या या सोहळ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे विश्‍वस्‍त उपस्थित होते. ना.विखे पाटील यांच्‍या झालेल्‍या सन्‍माना बद्दल जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जिल्‍हा बॅकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डील, आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, आ.काशिनाथ दाते, कारखान्‍याचे चेअरमन कैलास तांबे, व्‍हा.चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे चेअरमन भास्‍करराव खर्डे, व्‍हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, ट्रक्‍स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, भाजपाचे कार्याध्‍यक्ष नितीन दिनकर यांच्‍यासह पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!