8.1 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

एक वर्षाच्या पोटच्या गोळ्याला फाशी देऊन नंतर आईची स्वतः आत्महत्या..

कर्जत( जनता आवाज वृत्तसेवा ):-कर्जत तालुक्यातील खांडवी या गावांमध्ये स्वतःच्या एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील खांडवी येथे राहत असणाऱ्या साक्षी कुमार कांबळे यांनी त्यांच्या एक वर्षाचा मुलगा स्वरूप कांबळे यास गळफास देऊन त्यानंतर स्वतःची ही जीवन यात्रा संपवण्याची खळबळ जनक व दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी स्वरूप कांबळे याचा वाढदिवस झाला . यावेळी डीजे देखीलं लावण्यात आला होता आणि मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेम विवाह झालेला होता. आणि दोघेही आनंदाने राहत असताना अचानक राहते घरामध्ये साक्षी कांबळे या आईने राहते घरामध्ये पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडे अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तत्पूर्वी तिने आपल्या एक वर्षाच्या मुलाला देखील गळफास देऊन मारले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली.

याघटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!