13.8 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

छञपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – सकल हिंदू समाजाचा तहसिलवर मोर्चा

नेवासा ( शहर प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर अक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या काही विघ्नसंतोषी समाजकंठकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी श्री खोलेश्वर गणपती मंदिरापासून सकाळी ११ वाजता सकल हिंदु समाजाच्यावतीने नेवासा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने नेवासा तहसिलदार संजय बिरादार व पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.
   यावेळी सकल हिंदु समाजाच्यावतीने काढलेला मोर्चा नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौकातून तहसिल कार्यालयावर शांततेच्या मार्गाने हातात भगवे ध्वज, छञपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत हा मोर्चा तहसिल कार्यालयावर आणण्यात आला.यावेळी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराजांची तुलना जिहादी औरंगजेबाशी करुन हा आक्षेपाहार्य मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करुन तमाम हिंदूंच्या भावना दु:खावले असल्याचे निवेदनात सकल हिंदू समाजाने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केल्या आहेत.
   या कारनाम्यातील मुख्य सुञधाराचा शोध घेवून या विघ्नसंतोषी कथित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.याप्रसंगी माऊली पेचे,संतोष पंढुरे,संतोष कुटे,सुनिल वाघ आदींचे भाषणे झाली . याप्रसंगी सतिष पिंपळे,शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख नितीन जगताप,भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे धनंजय काळे, कृष्णा परदेशी दिपक परदेशी राजेंद्र मापारी अजित नरुला सतिष गायके कैलास इरले बाबा लष्करे शिवा राजगीरे अनिल परदेशी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन जाधव मनोज हापसे राजेंद्र उपाध्ये सार्थक परदेशी मोहिनीराज सरगयै जालिंदर गवळी प्रशांत बहिरट गोटु हांडे सुरज नांगरे धनंजय काशिद पप्पु डौले किशोर बोरकर गणेश गायकवाड कृष्णा गायकवाड अक्षय टेकाळे किशोर पठाडे राजेंद्र कडु प्रतिक शेजुळ महेश गरुटे स्वप्निल मापारी व मोठ्या संख्येने सकल हिंदू बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हिंदूस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महारांजाची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांच्या प्रशासनाने वेळीच नांग्या ठेवून संबंधित आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!