5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

रस्त्यावर धावणारी नासिक सोलापूर एसटी अचानक पेट घेते तेव्हा… सुदैवाने जीवित हानी टळली

कर्जत( जनता आवाज वृत्तसेवा):-नाशिकहून सोलापूरकडे जात असणारी एसटी बसकर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नगर सोलापूर रोडवरआज दि. 24 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ने अचानक पेड घेतला. चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. बस मध्ये प्रवास करत असणाऱ्या सुमारे 40 प्रवासी व चालक वाहक मात्र सुखरूप आहे. 

याबाबत घडलेली घटना अशी की,नाशिक आगाराची एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 4952 ही बस सकाळी सहा वाजता नाशिक वरून सोलापूरला जाण्यासाठी निघालेली असताना एसटी बस मिरजगाव बस स्थानकापासून पाचशे मीटर वर येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरा जवळ आली असताना चालक संतोष टोपनदारे यांच्या लक्षात आले की, गाडीच्या इंजिन जवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असून इंजिन कडील बाजू कडून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबून पाहताना बॅटरी मधून धूर निघत आहे. यामुळे गाडी थांबवली असता एसटी बसने इंजिनच्या बाजूने अचानक पेट घेतला. हे लक्षात येतात ड्रायव्हर व कंडक्टर यांनी सतर्कता दाखवीत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. या गाडीतून जवळपास ४० प्रवासी प्रवास करत होते.त्या सर्वांना तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने एसटीच्या खाली उतरवण्यात आले .

काही वेळातच संपूर्ण एसटी बसणे पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी आजूबाजूने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही. कर्जत नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाला तात्काळ फोन करून बंब मागविण्यात आला.

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे घटनास्थळी आले. त्यांनी नागरिक व पोलीस पथक यांच्या मदतीने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

कर्जत येथील अग्निशमन बंब आल्यानंतर आज भिजवण्यात आली मात्र तोपर्यंत संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली होती. एसटी बस ला लागलेली आग पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती.

जुन्या एसटी बस धोकादायक सर्वच एसटी आगाराच्या एसटी बस गाड्यांची अवस्था मोठी वाईट झाली आहे. अनेक गाड्या रस्त्यामध्ये बंद पडत आहे. तर आज एवढ्या मोठ्या लांब पल्ल्याची गाडी अचानक रस्त्यावर धावत असताना तिने पेट घेतला ही बाब अतिशय गंभीर आहे. एसटी बस मधून प्रवास करताना चालक वाहक आणि प्रवाशांना सध्या तरी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याबाबत एसटी महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन जुन्या व खराब एसटी बस तात्काळ रद्द करून चांगल्या एसटी बसेस रस्त्यावर आणण्याची गरज आहे.

मिरजगावकरांनी अनुभवला बर्निंग एसटी बस थरार

भर रस्त्यावर आकस्मात एस टी बस ने पेट घेतला . माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात मिरजगाव मधील नागरिक घटनास्थळी धावत आले. परंतु अवघ्या काही मिनिटात सीएसटीने चारी बाजूने पेट घेतला . पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर सर्व नागरिक बाजूला गेले आणि दूरवरूनच जळत असणारी एसटी बस पाहत होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!