लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील तृतीय वर्षातील एन.सी.सी. सिनिअर अंडर ऑफिसर आरती वाडेकर हिची नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन-२०२५ परेड संचलनात महाराष्ट्र डायरेक्टरच्या ट्रूपमध्ये सहभाग झाला असून ती महाविद्यालयाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड संचलनात करणार आहे.तसेच पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयातील माजी एन.सी.सी. कॅडेट दुर्गापुरचा भुमीपूण आणि माजी विद्यार्थी चेतनकुमार दत्तात्रय भारती यांची ३० सप्टेंबर २०१७ रोजी भारतीय सेनेमध्ये (आर्मी) निवड झाली.
महाविद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून देशाच्या सैन्यदलात रुजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी चेतनकुमारने कठोर मेहनत घेतली. महाविद्यालयीन जीवनामध्येच एन.सी.सी. ‘बी’ सर्टिफिकेट/ द्वितीय वर्षाला असताना चेतनकुमारने २६ जानेवारी २०१४ रोजी राजपथ, नवी दिल्ली येथे होणार्या परेड संचलनात महाराष्ट्र डायरेक्टरच्या ट्रूपमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाविद्यालयातील एन.सी.सी. सिनीअर अंडर ऑफिसर म्हणून काम केले. आपल्या कॅडेट्स मित्रांना मार्गदर्शन केले. कुठल्याही एन.सी.सी. कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणार्या चेतनकुमारने प्रवरा औद्योगिक, संस्कृतिक व शैक्षणिक समुहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पद्मश्री विखे पाटील महाविद्याल, लोणी या ठिकाणी साजरा होणार्या स्वातंत्र्यदिन समारंभ- २०१४ परेड संचलनात परेड कमांडर म्हणून काम पहिले. संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते चेतनकुमारला २६ जानेवारी-२०१४ राजपथ, नवी दिल्ली येथे होणार्या परेड संचलनात प्रवरेच्या वतीने सहभाग घेतल्याबद्दल व भारतीय सेनेमध्ये निवड झाल्याबद्दल दोन वेळा सन्मानित करण्यात आले.
दुर्गापुर गावच्या रहवासी असणार्या चेतनकुमारने सिग्नल कोर, जबलपुर (मध्य प्रदेश) या ट्रेनिंग सेंटरमध्ये यशस्वीपणे खडतर परिश्रम घेऊन आर्मी प्रशिक्षण पूर्ण केले व दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय सेनेमध्ये कसम घेतली. अतिशय गौरवाची बाब म्हणजे कसम परेडमध्ये देखील चेतनकुमारला सर्व रीक्रूटमेंट मधून असणार्या विविध ट्रूपच्या संचलनात देखील परेड कमांडर म्हणून सन्मान मिळाला. भारतीय सेनेमध्ये सिग्नल कोर, जबलपुर येथे प्रशिक्षण घेत असतांना बेस्ट ड्रिलचे मेडल घेऊन चेतनकुमारला गौरवण्यात आले होते. चेतनकुमारने एन.सी.सी. मध्ये असतांना एकदा व भारतीय सेनेमध्ये असतांना २६ जानेवारी २०२० व २६ जानेवारी २०२५ असे दोनदा नवी दिल्ली येथील आर्मी परेड ट्रूप मध्ये सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिन समारंभामध्ये नवी दिल्ली येथे तीन वेळा भाग घेण्याचा बहुमान चेतनकुमारला मिळाला ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे.
सिनिअर अंडर ऑफिसर आरती वाडेकर आणि माजी एन.सी.सी. सिनिअर अंडर ऑफिसर चेतनकुमार भारती यांच्या यशासाठी महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन सुजाता थोरात, कॅप्टन डॉ. राजेंद्र पवार, लेफ्टनंट दशरथ खेमनर यांनी त्यास मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे शिक्षण संचालच डॉ. प्रदिप दिघे, कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर.ए. पवार, उपप्रचार्य डॉ. बी.डी. रणपिसे, डॉ. अनिल वाबले, डॉ. एस. बी. चौधरी, प्रा. एस. बी. गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे कॅम्पस संचालक डॉ. आर. ए . पवार यांनी अभिनंदन केले आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत संस्थेतील एनसीसी कॅरेट दरवर्षी नवी दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनामध्ये सहभागी होत असतात यावर्षी दुर्गापूरचा माजी विद्यार्थी चेतनकुमार भारती आणि आरती वाडेकर हे दोन्हीही प्रवरेचे विद्यार्थी आहेत चेतनकुमार भारती हा सलग तीन वेळा राजभवन येथे पतसंचलन करतो आहे.