लोणी दि.१६ प्रतिनिधी:-पद,प्रतिष्ठा आणि सर्वकाही विसरुन १९९७ मध्ये प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथे शिक्षण घेतलेल्या २१ माजी विद्यार्थी २५ वर्षानतंर प्राचार्य डॉ संजय गुल्हाने आणि माजी विद्यार्थी समन्वयक वरिष्ठ प्राध्यापक श्री सचिन निंबाळकर यांच्या आवाहनास साद देत एकञ आले.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी विभाग संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत जगातल्या विविध ठिकणी विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला होता. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील होत्या. पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवणीना उजाळा देतांनाच सौ.विखे पाटील यांनी आलेल्या माजी विद्यार्थांशी संवाद साधला. वेगवेगळ्या कंपनी आणि व्यवसायात अनेक चढउतार बघताना आलेल्या अनुभवाची शिदोरी मुलांसोबत वाटताना सर्वांच्या चेहऱ्यावर पद्मश्रींनी लावलेल्या वटवृक्षाची हि फळं असल्याचं सांगितलं. फौंडर डायरेक्टर डाटामॅटो पुणे सचिन लोंढे , राहुल दुधाडे हिमांशू कपाडिया यांनी मुलांना व्यवसायात का उतरावं याचं कारण कसं शोधायचं ते संबोधित केलं. व्यवसाय कधीही सुरु केला जाऊ शकतो परंतु त्यात प्रगती करत सातत्य राखणं महत्वाचं ठरतं. आर्थिक दृष्ट्या अतिशय सुदृढ परिस्थिती असताना व्यवसायात आलेल्या नुकसानातून पुन्हा शून्यातून नवीन कंपनी उभारणाऱ्या सचिन लोंढेंनी सांगितलं तुमच्यात दुर्दम्य आत्मबळ असेल तर काहीही शक्य आहे, परंतु संवादकौशल्य नसेल तर ते कठीण असतं. बसवराज अंगडी , अमिश संपत , तुषार वरसाईकर, मनोज जैन यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले.
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या सिल्व्हर ज्युबिली वर्ष १९९७ पास आउट माजी विद्यार्थी मेळावा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पा., सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, सर्व विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
….
प्रवरा हे माॅडेल आहे एक परिवार म्हणून कायम सोबत मिळते.शिक्षणांनतंरही वेगवेगळ्या समस्यासाठी प्रवरेचे मार्गदर्शन मिळत राहाते.प्रत्येकवेळी नवं काहीतरी येथे बघाल्या मिळते.म्हणूनचं एक अतूट नाते निर्माण झाल्याची प्रतिक्रिया माजी विद्यार्थ्यानी दिली.