नेवासा :- नेवासा तालुक्यात अफू आणि गांजाची शेती सुरू असल्याचे उघड झाले असून तब्बल १५ लाखांचे अफू आणि गांजाची झाडे एलसीबीच्या पथकाने आज जप्त केली आहे.
याबाबत हकिगत अशी की, दिनांक १४ मार्च रोजी एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, नेवासा तालुक्यातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब. गिलबिले यांनी त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व अफुचे झाडांची लागवड केलेली आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती एसपी राकेश ओला यांना कळवून त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नेवासा येथे जावून मिळालेल्या माहितीची खात्री करुन, स्थानिक पोलीस, पंच व इतर ‘साधने सोबत घेवुन प्रथम शहापुर, ता. नेवासा येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे शेतात पहाणी केली असता गव्हाचे शेतामध्ये २.५ फुट उंचीची दोन व घरा समोरे ८ फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्याने छापा टाकुन आरोपी बाबुराव लक्ष्मण साळवे याचे कब्जातील शेतामधून १,११,४२०/- रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे. तसेच देवगांव, ता. नेवासा येथे जावून रावसाहेब भागुजी गिलगिले यांचे शेताची पाहणी केली असता शेतात अफुच्या झाडांची लागवड केल्याचे दिसुन आल्याने छापा टाकुन आरोपी रावसाहेब भागुजी गिलबिले, वय ३८, रा. देवगांव, ता. नेवासा याचे कब्जातील शेतामधुन १३,८४,००० /- रु. किंमतीची ६९.५०० किलो ग्रॅम बजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे नेवासे तालुक्यातील शहापुर येथे कारवाई करुन १,११,४२०/ -रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे वं देवगांव येथे कारवाई करुन १३,८४,०००/- रु. किंमतीची ६९.५०० किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी ६२१ अफुची झाडे व बोंडे असा एकुण १४,९५,४२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई बाबत पोना / ६५८ संदीप संजय दरदंले, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ३०९/२०२३ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), १५, १८, २० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर, डिवायएसपी संदीप मिटके यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.