संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत साठवण तलावाचे काम सुरू आहे.त्या ठिकाणी ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने ब्लास्टिंग केल्यामुळेच या भागातील काही नागरिकांच्या घराला तडे गेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारला सूचना देऊन ज्या नागरिकांच्या घरांची नुकसान झाली आहे त्यांच्याशी बैठक घेऊन लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे निर्देश आ अमोल खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील झोळे चंदनापुरी आणि हिवरगाव पावसा या गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाचे काम सध्या प्रगतीपथा वर सुरू आहे.या ठिकाणी मशीनच्या साह्याने काम नकरता ब्लास्टिंग करून खडक फोडले जात आहे. या ब्लास्टिंग मुळे परिसरात राहणार्या नागरिकांच्या घरांना तडे गेले आहे .याबाबत परिसरा तील नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रार केली होती. या गंभीर तक्रारीची दखल घेत आ खताळ यांनी झोळे येथे जल जीवन मिशन अंतर्गत काम सुरू असणार्या साठवण तलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आमच्या घरांना तडे गेले आहे आम्ही या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले आहे .अशा तक्रारी नागरिकांनी आ अमोल खताळ यांच्याकडे केल्या. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या महिला अधिकारी व ठेकेदाराच्या प्रतिनिधीला धारेवर धरत चांगलेच खडे बोल सुनावले. जर ठेकेदार नुकसान भरपाई देत नसेल तर हे काम बंद करून टाका. तसेच जर ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल तर त्याला काळया यादीत टाका असे निर्देश आ खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले .
तसेच ज्या नागरिकांच्या घराला तडे गेले आहे त्या घरांचे पंचनामे करून घेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून घ्यावी असे निर्देश आ खताळ यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले
या साठवण तलावाच्या कामाजवळ झोळे येथील विश्वनाथ महाराज नवले यांचे राहते घर आहे ते घर सुद्धा यांचे घर जात आहे त्यांना ही दुसऱ्या बाजूला घर बांधून द्यावे असे निर्देश आ खताळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारी ठेकेदाराला दिले आहे.