अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांच्यावतीने रासनेनगर येथील दुर्गा माता मंदिरामध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना यावेळी जाधव यांच्यावतीने वाणाचं वाटप करण्यात आले.
चंदुकाका सराफ (बारामतीकर) यांच्या सहकार्याने हळदी कुंकू कार्यक्रमादरम्या लकी ड्रॉचा आयोजन करून महिलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेविका वंदना ताठे, माजी महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, माजी नगरसेविका सुरेखा विद्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
किरण बारस्कर, प्रिया जानवे, गीता गिल्डा, वंदना पंडित, कालिदी केसकर, रेणुका करंदीकर, राखी आहेर, निता फाटक, अर्चना बनकर, अस्मिता कांडिवकर, बागडे, व्यवहारे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.