26.9 C
New York
Friday, August 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

जुनी पेन्शन योजना राज्यात लागू करण्यासाठी राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आंदोलन…

नेवासा ( शहर प्रतिनीधी ) महाराष्ट्र शासनाने माहे नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक तसेच विविध समस्यांना तोंड देणेसाठी दुसऱ्यांवर अवलंबुन राहण्याची आपत्ती येऊ शकते. किंबहुना २००५ नंतर सेवेत लागलेल्या ज्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले, त्यांच्या कुटुंबाला अत्यंत नाममात्र रक्कम मिळाली असून त्या कुटुंबापुढे मोठे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झालेल्या अनेक घटना आपल्या राज्यात घडलेल्या आहेत.

 त्यासाठी जुनी पेन्शन योजना राज्यात लागु करण्यासाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या माध्यमातुन विविध स्तरावरुन निवेदने, मोर्चा, आंदोलने करुनही राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या सदर मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न करता आजपर्यंत कोणत्याही स्वरुपाची ठोस भूमिका घेतलेली नाही. त्या निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने दिनांक १४ मार्च २०२३ पासुन बेमुदत संप पुकारलेला आहे.या संपात नेवासा तालुक्यातील राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

या धरणे आंदोलनात महसूल विभागाचे सतीश क्षेत्रे, धीरज साळवे, अतुल भांगे, दीपक पांढरे, साई उपोड, ओम खुपसे, उत्तम रासकर, एम डोळस, श्रीमती, कासार, दहिफले, खोमने, निलेश बिबवे कृषी सहाय्यक संघटना जिल्हा प्रतिनिधी, विजय बर्डे ,अल्ताफ शेख , गोविंद बामनपल्ले ,महेश उपलवाढ,राहुल दांडगे 
बालाजी अवचार,अनिल साळुंखे, दिगंबर लोखंडे ,आर पी राठोड, गोरख जी काळे, जी डी टेमक श्रीमती सुनिता पुजारी ,श्रीमती सुनिता गोरे ,श्रीमती एन आर गवई 
श्री प्रमोद बर्डे .सोपान गायकवाड कार्याध्यक्ष अहमदनगर जिल्हा तलाठी संघ, नगर बद्रीनाथ कमानदार अध्यक्ष नेवासा तलाठी संघ ,अनिल गव्हाणे सल्लागार अहमदनगर जिल्हा तलाठी संघ नगर,तलाठी 
विजय जाधव अजित कोकणे राम गाडेकर सुनील खंडाळे संचालक रेव्हेन्यू सोसायटी नगर राहुल साठे सचिव तलाठी संघ ,कैतके, प्रदीप चव्हाण ,म्हसे घनश्याम नांगरे , जोशी व सर्व तलाठी व महसूल कर्मचारी व कोतवाल व मंडळ अधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
[महाराष्ट्र राज्य तलाठी संघ हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न असुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे बहुतांश सभासद हे २००५ नंतर सेवेत आलेले असल्यामुळे व कोणत्याही परिस्थितीत नविन कर्मचान्यांसाठी राज्यात जुनी पेन्शन योजना लागु झालीच पाहिजे, ही राज्य तलाठी संघाची ठाम भूमिका आहे]. – सोपान गायकवाड कार्याध्यक्ष.
{महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने दिनांक १४ मार्च २०२३ पासुन पुकारलेल्या बेमुदत संपात आम्ही अहमदनगर जिल्हा तलाठी संघाचे सर्व तलाठी / मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील सभासद सहभागी होत आहोत. }- सोपान गायकवाड कार्याध्यक्ष . बद्रीनाथ कमानदार अध्यक्ष
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!