पानेगांव ( जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगाव (ता. नेवासे)येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहण उपसरपंच दत्तात्रय घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी मुळाचे संचालक संजय जंगले हे होते.मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, सतिश जंगले, मनोज आंबेकर सुनिल भवार संजय पवार संजय वाघमारे बाळासाहेब वाघमारे,माजी सरपंच हौशाबापू जंगले,माजी उपसरपंच डॉ जयवंतराव गुडधे, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे उपाध्यक्ष सुरेंद्र जंगले, मुख्याध्यापक वि. डी. दहिफळे सर यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले
.प्रमुख पाहुण्यांनी देशभक्तीपर भाषण दिले. भारत स्वतंत्र व्हावा म्हणून बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांच्या, नेत्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कार्याला उजाळा देत विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. आपुलकी जंगले या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊंचा वेशपरिधान करून त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. शाळेतील विद्यार्थानी भाषणे, देशभक्तीपर गीते, लेझीम सादर केली. शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. पानेगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव अतंर्गत कृषी महाविद्यालय सोनई येथील कार्यरत कृषी कन्या प्रणवी सानप, निकिता शिरोळे, आरती सोळंकी, प्राजक्ता खुणे, पूजा सातव, कोमल साळुंके यांनी कृषिदिंडी चे आयोजन करून जय जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा, व स्वच्छ भारत अभियान अस्या घोषणा देत गावभर कृषी दिंडी चे आयोजन करण्यात आले.सुत्रसंचालन मच्छिंद्र खेमनर आभार संकेत गुडधे यांनी मानले उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.