31.8 C
New York
Tuesday, June 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन २० मार्च २०२३ अर्ज करण्याची अंतिम मुदत

अहमदनगर, दि. १४ (जिमाका वृत्तसेवा) –वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी २० मार्च २०२३ पर्यंत समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत यासाठी व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण २ पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी पात्रतेची नियमावली ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या चार वर्षांसाठी चार वेगवेगळे अर्ज करावेत. अर्जासोबत नियमानुसार आवश्यक योग्य माहिती जोडावी, असे आवाहनही श्री.देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!