शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील दि २६ जानेवारी पासून बेपत्ता झालेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांचा निर्घृण पणे हत्या झाल्याचे उघड झाले असून रात्री मुंडके एका विहीर सापडले तर आज शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुसऱ्या विहिरीत धड उर्वरित शरीर सापडले गेले या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली गेली आहे.
बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिर गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एकबुर्जी लगत असून मंदिरात गेल्या १४ वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे दि २६ तारखेपासून गायब झाले होते त्यासंदर्भात एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांकडे पुजारी गायब झालेले बाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती त्यांचा शोध सुरू असतानाच गुरवारी मंदिर जवळच्या सुशीलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरी जवळ गुरवारी रात्री मोठी दुर्गंधी येवू लागल्याने त्या विहिरीत पाहिले असता त्या ठिकाणी दहातोंडे यांचे शिर मुंडके आढळून आले या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली त्यानंतर बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी घटनास्थळी पोलिस दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ते मुंडके रात्री उशिरा विहिरी बाहेर काढन्यात आले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली गेली असल्यामुळे भविकात मोठा असंतोष निर्माण झाल्याने घटनेची माहिती मिळताच आज शुक्रवारी दुपारी घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ आदी पथक घटनस्थळी दाखल होऊन या हत्येचा शोध घेत असतानाच त्यानंतर आज शुक्रवारी सायंकाळी च्या सुमारास मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीत दुर्गंधी येवू लागल्याने पाहणी केली असता दहातोंडे यांचे उर्वरित शरीर आढळून आले.
या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली आहे दहातोंडे हे मूळ नागलवाडी ता शेवगाव येथील रहिवासी आहेत त्यांना विवाहित दोन मुले,पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे या हत्याच्या घटनेचा निषेध करून सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी तसेच या गंभीर घटनेचा तपास एल सी बी कडे तपास देण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी बोधेगाव कडकडीत बंद चे अहावन केले आहे.
या हत्या प्रकरणी संशयित म्हणून एका जणाला ताब्यात घेतले आहे ही क्रूर हत्या का केली या मागचे नेमक कारण काय आणि कोणी केली याबाबत ग्रामस्थ व भविकात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
गेल्या काही महिन्या पूर्वी या पहिलवान बाबा मंदिरातील मूर्तीची फोडतोड करून विटंबना केल्याची घटना घडली होती त्यासंदर्भात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली या गंभीर हत्येच्या घटनेचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे पोलीस रात्री उशिरा पर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



