लोणी दि.१४ प्रतिनिधी:-शिर्डी मतदार संघात भविष्याचा वेध घेऊन विकास कामे ही होत असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू झालेले जल जीवन मिशनची कामे योग्य पद्धतीने पूर्ण व्हावीत म्हणून पदाधिकारी आणि ग्रामस्थानी सुध्दा जागृत राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे काम आदर्श होण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
मोदीजींच्या संकल्पनेतील योजनेचे काम आदर्श पध्दतीने व्हावे -सौ.शालिनीताई विखे पाटील. जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
लोणी बुद्रुक आणि खुर्द या दोन्ही गावांच्या दृष्टीने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जल जीवन मिशन अंतर्गत ६२ कोटी ६३ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भुमीपूजन सौ.शालीनी विखे पाटील यांनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जल जीवन मिशनचे शाखा अभियंता एस. जे. गायकवाड, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव विखे, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नदुशेठ राठी, लोणी बुद्रुकचे सरपंच कल्पनाताई मैड, उपसरपंच गणेश विखे, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब आहेर विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर, दादासाहेब घोगरे, माजी संचालक कारभारी आहेर, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे, , सिनेटचे माजी सदस्य अनिल विखे, प्रवरा भाजीपाला सोसायटीचे संचालक बंडू पाटील लगड, सेवासंस्थेचे अध्यक्ष अशोकराव धावणे, माजी अध्यक्ष सी. एम. विखे, एन. डी विखे, धनंजय आहेर, सोमनाथ घोगरे, सुहास घोगरे, नानापाटील म्हस्के, राहुल धावणे, अण्णासाहेब म्हस्के, राहुल धावणे, किशोर धावणे, दादासाहेब म्हस्के आदीसह दोन्ही गावांतील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. शालिनीताई विखे
पाटील म्हणाल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनासाठी मोठ्या प्रमाण निधी उपलब्ध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतून ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी हर घर जल योजना सुरू आहे. शिर्डी मतदार संघ आणि जिल्ह्यातही या योजनेतून मोठा निधी प्राप्त झाला आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेकडे विशेष लक्ष दिले असल्याचे सांगून सौ विखे म्हणाल्या की, लोणीची ही योजना २०५४ मध्ये वाढणा-या दोन्ही गावच्या लोकसंंख्येचा विचार करून करण्यात आली आहे.
शासन योजना प्रभावीपणे राबवितांना गट-तट बाजूला ठेऊन काम करा असे सागतांनाच योजना आपली आहे त्यावर लक्ष ठेऊन काम पुर्ण करण्यासाठी आपले योगदान द्यावे असेही त्या म्हणाल्या.यावेळी जलजीवनचे शाखा अभियंता एस. जे. गायकवाड यांनी योजनेची माहीती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल विखे यांनी केले.
{लोणी बुद्रुक आणि खुर्द हा भेद आम्ही कधी केला नाही आणि करणार नाही शेवटी जनतेची प्रश्न सोडविणे हाच आमचा प्रयत्न आहे असे सौ. विखे पाटील यांनी सांगून पाणी पुरवठा योजनेसाठी सोलरचा उपयोग करून ही पाणी पुरवठा योजना २०२४ मध्ये पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.}