प्रवरानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयातील १९६८ सालच्या जुनी अकरावी वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयात हुतात्मा दिनाच्या निमित्ताने नुकताच उत्साहात संपन्न झाला. यावेळी तब्बल ५६ वर्षांनी माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकवटल्याने त्यांनी आनंद द्विगुणित केला.
१९६८ साली जुनी अकरावी या वर्गात शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्यातील प्रमुख अतिथींच्या हस्ते हुतात्मा दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य संजय ठाकरे यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शेतकरी नेते उत्तमराव आहेर, माजी चेअरमन तुकाराम बेंद्रे, प्रभाकर निर्मळ, बापूसाहेब बेंद्रे, संपतराव खर्डे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहवस्त्र आणि गुलाब पुष्प देऊन प्राचार्य संजय ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य संजय ठाकरे व उपप्राचार्य अलका आहेर यांनी या भेट वस्तूंचा स्वीकार केला. यावेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक आर. डी. चौधरी, डॉ. अनंत देवधर, तुकाराम बेंद्रे, बापूसाहेब बेंद्रे, प्रभाकर निर्मळ, चंद्रकांत भोंगाळे यांनी मनोगतातून तत्कालीन आठवणींना उजाळा देत कर्मवीरांचे आणि रयत शिक्षण संस्थेचे धन्यवाद व्यक्त केले.
या स्नेहमेळाव्याचे संयोजन बापूसाहेब बेंद्रे, विठ्ठलराव कडस्कर, बबन कडू,धोंडीराम कडू, भागवतराव कडू, लिलावती आहेर, शंकरराव हिवडकर, दत्तात्रय चौधरी आदींनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट आणि अश्विनी सोहोनी यांनी केले तर कचरू विखे यांनी आभार मानले.
या माजी विद्यार्थ्यांसाठी संपतराव खर्डे यांनी कोल्हार येथील संस्कार संपदामध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी भाऊसाहेब शेळके, भाऊसाहेब घोलप, विठ्ठल निबे, सुधाकर खोसे, अशोक सोनवणे, वेणूनाथ कडू, बाबासाहेब घोगरे, दगडू घोगरे, अरविंद धुमाळ, रावसाहेब कडू, साहेबराव कडू, जनार्दन कोरडे, धनंजय तांबवेकर, अशोक संचेती, सोपान अंत्रे, भागवत विखे, रामनाथ चौधरी, किसन विखे, दगडू खर्डे, शिवाजी वाबळे, मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, रेणुका वर्पे, माधुरी वडघुले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह आदी उपस्थित होते.
प्रवरानगरच्या गांधी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांचे स्नेह वस्त्र व गुलाब देऊन स्वागत करून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. परंतु, ५६ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी एकत्रित येणे हा दैवी योगच म्हणावा लागेल आणि याचे सर्व श्रेय खर्डे परिवाराला दिले गरजेचे आहे. संपतराव खर्डे यांनी सारिका हिला शाळा काढण्यासाठी घेतलेली तळमळ व तिला दिलेले योगदान हे येणाऱ्या पिढीसाठी नेहमी प्रेरणादायी असणार आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुरुकुल शाळा होय. जी शाळा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते
– प्रकाश परब, पुणे