कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत एकूण 220 विद्यार्थी विद्यालयातून बसले होते. यातील चार विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम येऊन त्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
इयत्ता सहावी वर्गातून अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रथम वाघमारे अनन्या बबन, इयत्ता सातवी वर्गातून जिल्ह्यातून प्रथम खपके संस्कार गणेश व दळे विश्वजीत विलास, इयत्ता आठवी वर्गातून जिल्ह्यात प्रथम शेख अल्फिया अल्ताफ हे चार विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आले असून त्यांना गांधी रिसर्च फौंडेशनच्यावतीने गोल्ड मेडल देण्यात आले.
या विद्यार्थ्यांना या विभागाचे विभाग प्रमुख सोनवणे एन. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाच्या प्र. प्राचार्या संजीवनी आंधळे, प्र. पर्यवेक्षक शब्बीर शेख, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अँड. सुरेन्द्र खर्डे पाटील, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, सदस्य बी. के. खर्डे, अजीत मोरे, संजय शिंगवी, अशोक आसावा, रविंद्र देवकर, विभागीय अधिकारी बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी, तोरणे यांसह सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.