9.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

अवकाळीने शेतीचा शिमगा..!अवकाळीची अवकळानिसर्ग कोपलाबळीराजावर अस्मानी संकट

कोल्हार (प्रतिनिधी ):  अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात गत दोन दिवसांत झालेल्या वादळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची अवस्था होत्याची नव्हती झाली. निसर्ग कोपल्याने अवकाळीच्या अवकळा जिल्ह्यवर पसरली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला असून शेतातील उभे पीके भुईसपाट झाली आहेत. अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा यावेळी पुन्हा शिमगा झाला असून संकटात सापडलेला बळीराजा आता मायबाप सरकार आता आम्ही कसे जगायचे अशी आर्त साद घालत आहे. 
आस्मानी आणी सुलतानी अशा दोन्ही संकटाचा सामना करणारा शेतकरी सातत्याने अडचणीत सापडताना दिसतोय. शेतमाल चांगला पिकला तर भाव नाही आणी पिक हातात येणार तर निसर्गाची अवकृपा. अशा दुहेरी दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. आता आपल्याला गव्हाचे चांगले उत्पन्न मिळेल हि आशा असणा-या शेतकऱ्यांच्या स्वप्नावरच पावसाने पाणी फिरवलं आहे. गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यसह कोल्हार भगवतीपुर व प्रवरा परिसरातील पिकांची दाणादाण उडवली आहे.
जिल्ह्यतील आठ तालुक्यात किमान चार हजार हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर येत आहे. अनेक तालुक्यांमध्ये  वादळी पावसाने शेतकऱ्यांनी पिकवलेला गहू, हरभरा भुईसपाट केलाय तर द्राक्ष,डाळिंब यांसारख्या बाग उध्वस्त होत आहेत. राहता तालुक्यातील कोल्हार गावातही अनेक शेतकऱ्यांचा हातात तोंडाशी आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्यावर्षी झालेल्या नुकसानीची अजून भरपाई मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणी आता पुन्हा नवीन संकट उभं राहील्याने बळीराजाच कंमबरंड मोडत आहे.
————————–
पंचनामे करून तातडीने बळीराजास मदतीचा हात देणार..

राधाकृष्ण विखे पाटील,( महसुलमंत्री म.राज्य )
राज्यसरकार शेतकरी हितासाठी निर्णय घेत असून गेल्यावर्षी देखील एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत सरकारने केली. जवळपास साडेचार हजार कोटी रूपयांची मदत सरकारने केली असून आत्ता झालेल्या नुकसानीचेही तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देणार आहोत.
——————-
सुलतानी सरकार आणि अस्मानी संकट..

ॲड.सुरेंद्र खर्डे ( शेतकरी )
मागील वर्षाची नुकसान भरपाईची मदत अद्याप नाही. विमा कंपन्यांकडून फसवणूक होत आहे तर मदतीचे केवळ आश्वासन अन घोषणांचा पाऊस सरकार कडून केला जात आहे. २०२४च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आनंदाचा शिधा वाटप नव्हेतर रेवडी वाटप सुरू होत आहे. शेतकरी सोडून सर्वांना मदत करीत असल्याने हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची दहा हजार कोटी मदत वर्ग केली ती कुठे आहे. केवळ  व्यावसायिक व मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकरी राबतोय. गव्हाला भाव मिळणार त्याचवेळी केंद्र सरकार बफर स्टोक मधून ३० लाख टन गहू बाहेर काढीत असल्याने मार्केट मध्ये साडेतीन हजार रुपयांचा गहू दीड हजारांवर जाण्याची भीती आहे. सरकारमध्ये भूमिपुत्र व शेतकरी असणारे मंत्री सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाहीत हे दुर्दैव.
——————

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!