7 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा शहरास नियमित स्वच्छ पाण्याचा पुरवठा करा नगरपंचायतला टाळे ठोकण्याचा शहर काँग्रेसचा ईशारा

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :-नेवासा शहरास स्वच्छ पाण्याचा पुरवठा योग्य वेळेवर करा अन्यथा नेवासा नगरपंचायतला टाळे ठोकण्याचा ईशारा नेवासा शहर काँग्रेसने मुख्याधिकारी यांना दिला.

नेवासा ग्रामपंचायतची नगरपंचायत होऊन दहा वर्ष पूर्ण होत आली परंतु शहरातील समस्या संपता संपेना. जनतेचे होणारे हाल आजही तेच आहे जे पूर्वी होते.शहरातील मुख्य पायाभूत सुविधा तर सोडाच शहरातील स्वच्छता, पाणी पुरवठा या समस्या आजही तशाच आहेत. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या योजनेस चाळीस वर्ष उलटून गेले. लोकसंख्याचा विचार केला असता या योजनातुन होणारा पाणीपुरवठा अत्यल्प आहे. तर या योजनेची मुदत देखील संपलेली आहे,पाणी फिल्टर होण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

आजही नगर पंचायतला पाणी पुरवठा देखरेखीसाठी अभियंता नाही. नेवासा उपनगरास व शहरास आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो तेही अत्यल्प, शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. या समस्याची नेवासा शहर काँग्रेसने दखल घेत आज नगरपंचायत मुख्याधिकारी यांची भेट घेतली व शहरातील पाणी पुरवठा समस्यावर चर्चा केली. शहराला नियमित स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली तसेच वेळीच जर स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला नाही तर नगर पंचायतला टाळे ठोकण्याचा ईशारा नेवासा शहर काँग्रेस कडून देण्यात आला.यावेळी नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी शहरात स्वच्छता, मोकाट जनावरे, पाणी पुरवठा, अशा अनेक समस्या आहेत त्या सोडविण्याऐवजी त्यावर राजकारण जास्त करण्यात येते.

नागरिकांना पाणी व घरपट्टी या मोठया फुगवून दिलेल्या आहेत या भरण्यात नागरिक हैराण झालेले आहेत. त्या प्रमाणात नागरिकांना सुविधा मिळत नाही.तर बसपाचे हरीश चक्रनारायण यांनी याविरोधात तीव्र भूमिका घेत जर समस्या सुटल्या नाही तर नगरपंचायतचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा दिला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, इम्रान पटेल,उपाध्यक्ष कैलास बोर्डे, बहुजन मुक्ती मोर्चाचे गणपत मोरे आदी उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!