8.4 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोल्हारच्या बाल गोकुलम ॲकेडमीत स्नेहसंमेलन उत्साहात

कोल्हार ( वार्ताहर ) :- लहानग्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सादर केलेले विविधांगी कलाविष्कार, सामुहिक नृत्य, गायन, नाटिका यासोबत चिमुकल्या गुणवंतांचा सन्मान आणि मान्यवरांचे मार्गदर्शन. अश्या निरनिराळ्या कार्यक्रमांसह कोल्हार बुद्रुक येथील बाल गोकुलम ॲकेडमी  स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आण्णासाहेब कदम शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. जयराम खंडेलवाल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र थेटे, ओरॅकल कॉर्पोरेशन, मुंबईचे प्रॅक्टीस डायरेक्टर नंदकुमार कदम, पत्रकार संजय कोळसे, पत्रकार सुहास वैद्य, बाल गोकुलम अॅकेडमीचे अध्यक्ष सोन्याबापू मोरे, विजय सहाणे, किरण शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
            याप्रसंगी ॲड. सुरेंद्र खर्डे म्हणाले, काही वर्षापूर्वी येथे सुरु झालेल्या बाल गोकुलम ॲकेडमी या रोपट्याचा आता वटवृक्ष होतांना दिसत आहे. निव्वळ शाळा उभ्या राहू नयेत, तर त्यामध्ये दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे असते. या ॲकेडमीमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते म्हणूनच पालकांचा मोठा प्रतिसाद येथे पहावयास मिळतो. या विद्यालयाने गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. या शैक्षणिक संकुलाला उज्वल भवितव्य असल्याचे त्यांनी सांगितले.     
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बाल गोकुलम ॲकेडमीच्या  प्राचार्या सौ. शारदा मोरे यांनी वार्षिक अहवालवाचन केले. यामध्ये संपूर्ण वर्षभरात विद्यालयामध्ये राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी पालकांच्यावतीने जितेंद्र खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चैताली गटणे, सौ. नैना रोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष सोन्याबापू मोरे, प्राचार्या सौ. शारदा मोरे, सौ. पूजा मोरे, सौ. माधुरी निबे, सौ. सिमा लोखंडे, कु. रेवती ससाणे आदी प्रयत्नशील होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!