8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

सक्षम कुशल आणि रोजगारक्षम युवा घडविण्याचे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंनवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि १२ (प्रतिनिधी):-शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून रोजगार निर्मितीला चालना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, त्यादृष्टीने अर्थसंकल्पात विविध योजनांची तरतूद करण्यात आली आहे. सक्षम कुशल आणि रोजगारक्षम युवा घडविण्याचे सरकारचे धोरण असल्याचे प्रतिपादन  महसूल, पशुसंनवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केले.
तालुक्‍यातील कनकुरी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मुंकूदराव सदाफळ, रघूनाथ बोठे, बाबासाहेब डांगे, भागवतराव डांगे, विजय डांगे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकार सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील शेती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी आता मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नव्या योजनेत  शेतक-यांना ठिबक सिंचन अस्तारीकरणासाठी या  योजनेतून मदत करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुर्वी पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी राज्य सरकारनेच आता विमा रक्कम भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय केला असल्याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की, शेती आणि शेतीपूरक व्यवसायातून रोजगार निर्मिती हेच सरकारचे उद्दीष्ट आहे. यासाठी नगर जिल्ह्य़ात मेंढी व शेळी सहकारी महामंडळाची होणारी निर्मिती मोठी उपलब्धी असून राज्य सरकारने यासाठी १० हजार कोटी रुपयांची बिनव्याजी केलेली तरतूद रोजगार निर्मितीला अधिक गती दणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्‍यक्‍त करुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
शिर्डी आणि परीसराला समृध्दी महामार्गा बरोबरच येत्या काही दिवसात सुरू होणारे विमानांचे नाइट लॅन्‍डींग, वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा यामुळे दळणवळणाला मोठी संधी निर्माण झाली असल्याने याचा रोजगार निर्मितीत कसा करून उपयोग करून घेता येईल यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहे. शेती महामंडळाच्या जमीनींवर आयटी आणि लॉजेस्टीक पार्क उभारून या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी देण्यास प्राधान्यक्रम असेल आशी ग्वाही देवून राज्य सरकारने पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि शिर्डी विमानतळाच्या इमारतीकरीता ५२७ कोटी रुपये मंजूर केल्याची माहीती त्यांनी दिली.
शिर्डी मतदारसंघातील जनतेने आजपर्यंत दाखवलेला विश्वास आपण कामाच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. विकास कामांमधून या मतदार संघाचा नावलौकीक कसा वाढेल असाच प्रयत्न राहीला. या विश्वासानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमत्री अमित शाह,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या पदावर काम करण्याची दिलेली संधी सुध्दा मतदार संघातील जनतेमुळे प्राप्त झाल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कनकुरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ युवक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!