शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):- काल पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ झालेल्या रस्ता लुटीतून दुहेरी खून व एक ग्रामस्थांवर हल्ल्यामुळे साईनगरी हादरली आहे. काल भल्या पहाटे भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
कालच्या घटनेमुळे शिर्डी येथील वातावरण अतिशय तणावयुक्त आहे. या घटनेचे तीव्र प्रसाद उमटलेले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या घराची जागा ही अनधिकृत होती आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली. तसेच, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
हत्याकांडात असलेल्या दोन आरोपीपैकी एक आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलीस प्रशासनकडून शोध सुरू आहे .



