11.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेरला १० आधुनिक ई-टॉयलेट्स उभारणार -आ खताळ शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरामध्ये स्वच्छता गृहाची गंभीर समस्या बनली होती ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. या अनुदाना तून संगमनेर शहरामध्ये १०आधुनिक ई-टॉयलेट्स उभारले जाणार आहे.त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान” योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या ई टॉयलेट च्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुधारणा आणि स्वच्छतेच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल पडणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

या ई टॉयलेट प्रकल्पात आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केला असून, स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान ,टचलेस ऑपरेशनसाठी सोलर लाइटिंग सिस्टम व पर्यावरणपूरक ऊर्जा वापरासाठी वॉटर रिसायकलिंग युनिट्स यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच, त्या पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत केली जाणार आहे. आणि महिलां साठी स्वच्छ व सुसज्ज टॉयलेट्स स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्वच्छता ही केवळ सुविधा नाही, तर ती आरोग्य आणि विकासाची मूलभूत गरज आहे. या प्रकल्पामुळे सांगमनेरच्या नागरी स्वच्छतेत फार मोठा बदल होणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर करून,शहराच्या प्रगतीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठीसंगमनेरच्या नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले”

महायुती सरकारमुळे प्रकल्पाला वेग

महायुतीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे या महत्त्वाच्या कामांना गती मिळाली आहे. विशेषतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाला तातडीने आदेश देऊन हे काम सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होईल, 

        – आमदार अमोल खताळ

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!