शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डीत सोमवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे पडसाद राज्यासह देशभर उमटले. या घटनेत शिर्डीचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राहात्याचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती करण्यात आली. राहात्याला गलांडे यांच्या जागी नितिन चव्हाण यांची नेमणूक झाली आहे.
मात्र खुनाची घटना अपघात असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस हवालदारावर मात्र कारवाई झाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आरोपी किरण सदाफुले याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 40 पोलिसांची पाच पथके दुसर्या आरोपीचा शोध सुरू होता . परंतु पोलीस यंत्रणे तपास चक्रे जलदगतीने फिरवल्यामुळे दुसरा संशयित आरोपी राजू उर्फ शक्या माळी हा आज पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे.
दुहेरी हत्याकांडातील दुसरा संशयित आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे राजु उर्फ शाक्या अशोक माळी (वय 29 वर्षे, रा.गणेशवाडी, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यास शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 53/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 126, 309 (6), 311, 312 आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे हे करीत आहे. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, ठाणेअंमलदार यांनी केले.
दुहेरी हत्याकांडांत साई संस्थांनच्या दोन कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेतील मुख्य दोन्ही आरोपी शिर्डीतील गणेशवाडी येथे दुसर्याच्या जागेत राहतात. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सोमवारी आरोपी राहतात तेथील मूळ मालकाने त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी ते घर खाली न केल्याने मंगळवारी सकाळी जागा मालकाने जेसीबी आणून त्यांना ते घर खाली करण्यास सांगितले. परंतु आरोपींच्या नातेवाईकांनी घर खाली करण्यास नाकार देऊन मोठा गोंधळ घातला. त्यामुळे जमीन मालकांनी त्यांना त्यांचे घर खाली करण्यासाठी आनखी एक दिवसाची मुदत दिली असल्याच समजते.