28.6 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

केंद्र सरकारच्या फ्लोरी कल्चर मिशनद्वारे फुल शेती चालना – डाॅ.विजय वाघ

लोणी दि.११ (प्रतिनिधी):-शेती क्षेञात केंद्र सरकारच्या धोरणातून होत असलेल्या बदलामुळे उत्पादन, मार्केटींग आणि प्रक्रिया या सुविधामुळे  फ्लोरी कल्चर मिशनद्वारे फुल शेती चालना मिळत असून शेती क्षेत्रातही टाकाऊ पासून टिकाऊ या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून फुल शेतीला शाश्वता येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय वनस्पती अनुसंधान लखनौचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय वाघ यांनी केले.
    जनसेवा फौंडेशन, लोणी, कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर कृषि विभाग आणि सी. एस. आय. आर. लखनौ यांच्यावतीने आयोजित फुल शेती लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेत डॉ. विजय वाघ बोलत होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी डॉ. बापूसाहेब शिंदे कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ  शैलेश देशमुख, मृदविज्ञान विभागाचे प्रमुख शांताराम सोनवणे, पिक संरक्षण विभागाचे प्रमुख भरत दंवगे, सी. एस. आय आर, लखनौचे शास्त्रज्ञ डॉ. इतियाज हम्मद,नंदु गव्हाणे,ज्ञनदेव चौधरी,श्रीनिवा ञिभुवन,किशोर कडू आणि फुल शेती उत्पादक उपस्थित होते.
   आपल्या मार्गदर्शनात डॉ. वाघ म्हणाले फ्लोरी कल्चर मिशन द्वारे २१ राज्यात फुलशेती लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. देशातील विविध संस्थाच्या माध्यमातून हे काम शेतक-यापर्यत पोहचवित असतांना नवीन प्रजाती, उत्पादकता वाढ, टिकाऊ क्षमता वाढ आणि टाकाऊ पासून टिकाऊ या तंत्राचा उपयोग केला जातो.  मार्केटींग बरोबरचं प्रक्रिया उद्योगाला ही चालना देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. झेंडू, शेवंती, निशीगंध, गुलाब याबरोबरचं पारंपारीक फुलांवरही संशोधन करून फुल शेतीला शाश्वत केले जात आहे. प्रात्याक्षिकावर भर देतानाच हर्बल उत्पादन प्रक्रियेला चालना दिली जात आहे. फ्लोरी कल्चर मिशनद्वारे रोजगार निर्मीती बरोबरचं  शेतक-यांना फुल शेतीचे परिपूर्ण ज्ञान दिले जाते. यामध्ये शेतक-यांनी सहभागी व्हावे असेही  सांगितले.
    यावेळी तालुका कृषि अधिकारी डॉ. बापूसाहेब शिंदे यांनी फुलशेतीचा आढावा घेतांनाच यातील संधी आणि भविष्य याबरोबरचं फुलशेतीसाठीच्या योजनाची माहीती दिली. प्रारंभी शैलेश देशमुख यांनी फुलशेतीचा आढावा घेत फुलांपासून तयार होणा-या अगरबत्ती,धुप अष्टगंध, अत्तरे याविषपी माहीती दिली. कार्यक्रमाचे सुञ संचालन यमन पुलाटे यांनी तर आभार शांताराम सोनवणे यांनी मानले.
महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फौडेशन,लोणी अंतर्गत फुल  प्रक्रिया उद्योग,फुल शेती आणि सुंगधी औषधी वनस्पती लागवड याविषयी मार्गदर्शन होत असल्याने नावीन्य पुर्ण शेतीला प्राधाने मिळून रोजगार निर्मीती ही होत आहे लखनौ आणि लोणी-प्रवरा हे लॅब टू लॅन्ड चे माॅडेल बनत आहे.यामुळे शेतक-यांनाही फायदा होत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!