6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

सत्तेचा दुरुपयोग करून माजी मंत्र्यांनी  शासनाच्या पैशाची उधळपट्टी केली भाजपा तालुका सचिव .महेश मांडेकर यांनी केला गंभीर आरोप

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):- संगमनेर शहर व तालुक्यामधील विविध प्रश्नांबद्दल ४० वर्षाच्या कार्यकाळात रस्ते, वीज,पाणीआरोग्य,शिक्षण,मूलभूत नागरी सुविधा नगरविकासाचे कुठलेही व्हिजन नजरेसमोर न ठेवता आपले जवळचे नाते वाईक आणि तालुक्यामधील प्रत्येक गटा मध्ये आणि शहरामध्ये ठराविक काही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर निर्माण करूनसरकारी नियमात,निकषात न बसणारे विकास कामं संगमनेर तालुक्याच्या माजी मंत्र्यां च्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून शासनाच्या पैशाची उधळपट्टी केली गेली असल्याचा गंभीर आरोप भाजपा तालुका सचिव .महेश मांडेकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच भाजपा महायुतीच्या मंत्र्यांकडे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार पत्र देत फिरत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत संगमनेर शहरातील क्रीडाप्रेमींसाठी मागील काळात स्टेडियम बांधले गेले

परंतु ते बऱ्याच कालावधी पासून खुलं करण्यात आलेले नाही.क्रिकेट प्रेमींसाठी स्टेडियम फार काही उपयोगी पडलं असं बिलकुल म्हणता येणार नाही पदवीधरचे आमदार तांबे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी वक्तव्य केलं की नगरपालिका क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकरिता ३ कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बी सी सी आय अधिकाऱ्यांना बोलावून हे क्रीडांगण आपल्याला कसं वापरात आणता येऊ शकेल ?याची सूचना मागवल्यानंतर त्यांनी छोट्या मोठ्या क्रिकेट मॅचेस घेता येतील असे सांगितले त्यानंतर आमदार तांबे क्रिकेट टेस्टिंग कॅम्प घेता येतील असेही सांगतात आपलं संगमनेरचं स्टेडियम फक्त ५५ यार्डचं आहे६८ /७० यार्डच्या स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय सामने आयोजित करतात असं पण सांगतात.

एकंदरीतच तांबे यांच्या वक्तव्यामध्ये सुस्पष्टता जाणवत नाही,स्पष्ट तफावत जाणवते

संगमनेर तालुक्यामध्ये आजपर्यंतचा संगमनेरचा इतिहास पाहिला तर विकास कामांचा निधी जवळचे नातेवाईक ठेके दार यांना लाभ मिळवून देण्यासाठी होत आलेला आहे.संगमनेर तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी म्हणून मागील काळात व आताही शुद्ध प्रामाणिक हेतू दिसून येत नाही .शिवसेना महायुतीच्या सर्वच घटक पक्षातील अध्यक्षांनी मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाला पदवी धरांचे प्रतिनिधी तांबे यांच्या अधिकारात असतील त्या कामांकडे, पदवीधरांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सांगावे.विनाकारण त्यांच्या अधिकारात नसणाऱ्या विकास कामांमध्ये त्यांनी ढवळाढवळ करू नये.

जवळच्या नातेवाईकांना व ठराविक ठेकेदारांना लाभ मिळण्याचे उद्देशाने जर कोणी शासनाच्या पैशाची उधळपट्टी करणार असतील तर त्या कामांबद्दल शासनाच्या आणि जनतेच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असल्याचे भाजपा तालुका सचिव श्री.महेश मांडेकर यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!