5.2 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार? पालकांसह नागरिकांमधून संतापाची लाट; श्रीरामपूर पोलिसांकडून नराधम गजाआड

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- ९ वर्षीय शाळकरी मुलीवर ५९ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याच्या घटना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पालकांसह नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पिडीतेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, श्रीरामपूर शहरामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शाळेत जात असतांना ५९ वर्षीय संजय गांगुर्डे या नराधमाने बळजबरीने झाडांमागे ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

यावेळी अल्पवयीन मुलीने आपल्या पालकांना घडलेली घटना कथन केली. त्यानुसार पालकांनी थेट श्रीरामपूर शहर पोलीस गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार ५९ वर्षीय व्यक्तीवर पीडितेच्या पालकांनी दिल्याने फिर्यादीवरून आरोपी संजय गांगुर्डे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६५(२),७४,७५,३५१ (२), बालकाचे अपराधापासून संरक्षण कायदा कलम ६,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नराधमावर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!