संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):– संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री. जयकुमार गोरे यांची मुंबईत भेट घेऊन मतदारसंघातीलविविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावरती मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना आता खर्याअर्थाने गती मिळणार आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज, आरोग्य सेवा आणि ग्राम पंचायतींच्या विकासाच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मतदार संघातील गावांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमल बजावणी होणे गरजेचे आहे.त्यासाठी संबंधित योजना मंजूर करून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागमी आ अमोल खताळ यांनी मंत्री गोरे यांच्याकडे केली .
ग्रामस्थांच्या गरजा आणि स्थानिक प्रशासनाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात मंत्री गोरे यांनी सकारा त्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जातील, असे ही आ अमोल खताळ यांनी सांगितले.
“संगमनेरच्या विकासकामांना गती मिळावी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि करत राहील. शासन दरबारी मतदारसंघाच्या हितासाठी अधिकाधिक योजना मंजूर करून घेत ग्रामविकासाला दिशा देणे, हा माझा मुख्य उद्देश आहे.आणि भविष्यातही ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या सहकार्याने संगमनेर विधानसभा मतदार संघातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न अविरत सुरू राहतील.
-आमदार अमोल खताळ