11.7 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

..त्यांची दहशत मोडून काढण्याचे काम करणार- मंत्री नितेश राणे; श्रीगोंद्यातील ससाणेनगर प्रकरणी राणेंनी घेतली पिडीतांची भेट

श्रीगोंदा (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीगोंदा तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात ससाणेनगर येथे लहान मुले फटाके फोडत असताना दगडफेक करण्यात आली. त्यानंतर ज्या काही घटना घडल्या. त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून हिंदू समाजाला धीर ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी मी मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून येथे आलो आहे. हे सरकार हिंदुत्ववादी विचाराचे सरकार असल्याचे प्रतिपादन मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्री राणे म्हणाले की, सरकार हिंदुच्या ताकदीमुळे स्थापन झाले आहे, या सरकारच्या काळात कुठल्या ही हिंदुवर कुठल्या ही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे. हिंदू समाज्यातील प्रत्येक व्यक्तीला विश्वास आहे की, हे सरकार पूर्णपणे तुमच्याबरोबर आहे. जो कोण जिहादी कुरेशी मस्ती करतोय? त्याला वाटत आहे हे पाकिस्तान आहे. त्याला कळेल आत्ता सरकार कशाला म्हणतात. पोलीस कशाला म्हणतात. त्याची दहशत मोडून काढण्याचे काम आमच्या सरकारच्या यंत्रनेच्या माध्यमातून करणार आहे. जेणेकरून कुरेशी उठण्याचाही प्रयत्न करणार नाही.

पुढे मंत्री राणे म्हणाले की, जे जे त्यांचे जिहादी मानसिकतेचे साथीदार श्रीगोंद्यात असतील त्यांना समजले पाहिजे येथे हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारमधील आमदार विक्रम पाचपुते, आमदार जगताप येथे आहेत. म्हणून त्यांची कुठली ही मस्ती आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पिडीतांना न्याय मिळण्यासाठी चालु असलेल्या उपोषणाला भेट देऊन पिडीतांचे मंत्री राणे यांनी सांत्वन केले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!