अहिल्यानगर ( जनता आवाज वृत्तसेवा):-डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या कृषी महाविद्यालय, विळदघाट, अहिल्यानगर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नांदगाव, ता. जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाले. या शिबिरात ग्रामस्वच्छता, डिजिटल साक्षरता अभियान, वृक्षसंवर्धन, रक्तक्षय तपासणी, बालविवाह प्रतिबंध जनजागृती, गाव रस्ते व नदी दुरुस्ती, व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यान, शेतीविषयक मार्गदर्शन आणि नवमतदार जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. महाविरसिंग चौहान (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी), डॉ. गोकुळदास गायकवाड (संचालक, ई.टी.आय, रा.से.यो., अहिल्यानगर), कृषिभूषण सुरशिंगराव पवार, गावाचे सरपंच श्री. सखाराम सरक, उपसरपंच नाथाभाऊ सरक, कायदेतज्ज्ञ ॲड. वैभव आघाव, जागतिक कुस्तीपटू श्री. राजकुमार आघाव, कृषी सल्लागार डॉ. सतीश सोनवणे, तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. महाविरसिंग चौहान यांनी युवकांनी निडर, स्पष्टवक्ते आणि सामाजिक जाणीव असलेले व्हावे असा संदेश दिला. प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शेतीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करावा आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे सांगितले.
रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. दांगडे यांनी शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली. या सात दिवसांत श्रमदान, पथनाट्य, प्रभात फेरी, नवमतदार जनजागृती, डिजिटल साक्षरता अभियान यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. तसेच डॉ. अशोक घोरपडे, श्री. प्रकाश लोखंडे, श्री. अक्षय पावडे, कृषिभूषण श्री. विष्णू जरे, कृषीरत्न सौ. क्रांती चौधरी, कायदेतज्ज्ञ ॲड. वैभव आघाव, डॉ. विजय पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी डॉ. अशोकराव ढगे (वरिष्ठ कृषी संशोधक, मफुकृवि, राहुरी) यांनी श्रमसंस्कार, राष्ट्रसेवा आणि युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद पाटील, तर आभार प्रदर्शन अभिजीत यादव यांनी केले.
या शिबिरासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय दादा विखे पाटील (मा. खासदार, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ) यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे महासचिव डॉ. पांडुरंग गायकवाड, डॉ. अभिजीत दिवटे (संचालक, मेडिकल), प्रा. श्री. सुनील कल्हापुरे (संचालक, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर) यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास गावकरी, शेतकरी, विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.