28.6 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकळीभान येथे विविध ठिकाणी शिव प्रतिमा पूजन

टाकळीभान, ( वार्ताहर ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने
बसस्थानक परिसरात, ग्रामपंचायत, टाकळीभान सेवा
सोसायटी आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
      यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी व भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. जय शिवाजी जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता.
       यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जेष्ठनेते राधाकृष्ण वाघुले, शिवसेना श्रीरामपूर तालूका
प्रमुख दादासाहेब कोकणे, आबासाहेब रणनवरे, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी युवासेनेचे अक्षय कोकणे, विलास सपकाळ, पवन मगर, पांडूरंग मगर, अमोल पटारे, अमोल हुळहळे, प्रशांत कोकणे, सुरज कोकणे, वैभव मैड ,केतन शिंदे, मनोज मगर, अमित सटाले, ऋषभ मगर, भैय्या मगर, विलास बोडखे, माजी सभापती नानासाहेब पवार, राहुल पटारे, राजेंद्र कोकणे, अविनाश लोखंडे, चित्रसेन रणनवरे, महेंद्र संत, बबलू वाघुले, भैया कोकणे तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते, शिवप्रेमी आदी उपस्थित होते.
       ग्रामपंचायत कार्यालयात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात
आली. यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजीराव शिंदे, दत्तात्रय नाईक, विलास दाभाडे, रावसाहेब वाघुले, शंकर पवार, पाराजी पटारे,मिठूमामा थोरात,  भाऊसाहेब पटारे, शिवाजी पवार, यशवंत रणनवरे, एकनाथ बनकर, सुनील बोडखे सुभाष ब्राम्हणे,  संजय बनकर,महेश लेलकर, बाळासाहेब आहेर,  पंढरीनाथ बिरदवडे,  मिलिंद शेळके, अशोक बनकर, सुनील रणनवरे आदी उपस्थित होते.
             
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!