संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-जनसेवा फाउंडेशनच्या वतीने संक्राती निमित्ताने महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा भव्य हार्दिक कुंकू कार्यक्रम शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी ताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खा डॉ सुजय विखेपाटील आणि रणरागिनी महिला मंडळ अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांच्या पुढाकारा तून संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावरती हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलां विविध खेळ घेण्यात येणार आहे
त्यामध्ये विजय ठरलेल्या महिलांना एक तोळा सोनेचे नेकलेस, सोनी कंपनीची एलईडी टीव्ही एलजी एलईडी टीव्ही 32, सॅमसंग फ्रिज डबल डोअर, वर्लपुल फ्रिज सिंगल डोअर, सॅमसंग वॉशिंग मशिन ऑडीकॉन वॉशिंग मशिन, वोलटास एअर कुलर, एओ स्मीथ वॉटर प्युरीफायर, प्रेस्टीज मिक्सर, वंडरशेफ ओव्हन, प्रेस्टीज व्हॅक्यम क्लिनर, प्रेस्टीज इंडक्शन, एओ स्मीथ वॉटर प्युटीफायर 10 ली., 4 बर्नर वंडरशेफ गॅस स्टोव्ह, सारेगामा कारवान व साड्या आदी वस्तू बक्षीस म्हणून देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विजेता महिलांना 500 पैठणीचे वाटप करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाचा तालुक्यातील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.