5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

आगामी सर्वच निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविणारच -आ. खताळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढ दिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-विधानसभा निवडणुकीमध्ये जसा या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला तसाच भगवा आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती साखर कारखाना नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित भगवा फडकवायचा आहे त्यासाठी सर्वच शिव सैनिकांनी जास्तीत जास्त शिवसेनेची सभासद नोंदणी करावी असा सल्ला आ अमोल खताळ यांनी शिवसैनिकांना केली.

संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने बस स्थानकावर राज्याचे उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर, शिवसेना वाढ विण्यासाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ शिव सैनिकांचा सन्मान तसेच गोरगरीब अनाथ मुलांना फळे आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे राजेंद्र सोनवणे रमेश काळे शहर अध्यक्ष विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमदार खताळ म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या वर आणि या मतदारसंघातील मतदारांवर शिवसैनिकांवर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही.

समाजकारणा बरोबरच राजकारण असे धोरण उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्या धोरणाप्रमाणे काम करून केंद्राच्या आणि राज्याच्या लोक कल्याणकारी योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी काम करावे असा सल्ला त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना दिला

प्रास्ताविक शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख अजित जाधव यांनी केले करून उपस्थितांचे आभार मानले

शिवसेनेची सर्वाधिक नोंदणी करणारे शिवसैनिक सौरभ देशमुख यांच्यासह सुशील शेवाळे आणि दिपाली वाव्हळ यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वयोवृद्धांना काठी कमरेचा व मानेचा पट्टा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मागास वर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष मांजा बापू साळवे महिला आघाडीच्या उप जिल्हा प्रमुख दिपाली वाव्हळ भाजप महिला आघाडी तालुकाप्रमुख कविता पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ राहुल खताळ आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह शहर व तालुक्यातून आलेले शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सर्वसामान्य महिला कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी जे काम केले ते न भूतो न भविष्य असे झाले आहे .आणि आता ते उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे ते आपल्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवतील आणि या मतदार संघा साठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास कामांना गती देतील यात अजिबात शंका नाही

श्री विठ्ठल घोरपडे (जिल्हा संघटक शिवसेना)

संगमनेरातील १०१ ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान

शिवसेनेसाठी जीवाचे रान करणारे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते अर्जुन काशीद माजी नगराध्यक्ष भाऊ पानसरे अण्णासाहेब काळे भारत शिंदे बाळासाहेब राऊत बंडू देशमुख रणजीत जाधव नारायण वाकचौरे पंढरीनाथ इल्हे विठ्ठल ढगे शिवाजी घोडेकर यांच्यासह शंभर ते सव्वाशे जेष्ठ शिव सैनिकांचा आ अमोल खताळ यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

आधार रक्तपेढीच्या वतीने घेण्यात आले ल्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे असे मानून ५० रक्त दात्यांनी यावेळी रक्तदान केले तर तसेच गोर गरीब विद्यार्थ्यांना तसेच रिमांड होम मधील अनाथ मुलांना शालेय साहित्य आणि फळ वाटप केले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!