पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. पुणे विमानतळावरून तो बेपत्ता झाल्याची माहिती असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी माहिती आहे.
पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणाहून राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या मुलाचं अपहरण होणं ही बाब अतिशय गंभीर आहे. सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्वीफ्ट गाडीतून चार लोक उतरले आणि त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास सुरू केला आहे.